धक्कादायक! एकीच्या आधार नंबरवर दुसऱ्याच महिलेने घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 05:00 IST2021-04-29T05:00:00+5:302021-04-29T05:00:41+5:30

नोंदणीकरिता आधारकार्ड क्रमांक सांगितला असता त्यांच्या नावाने आधीच कोविशिल्ड लस घेतल्याचे प्रमाणपत्र बघायला मिळाले. धक्कादायक बाब म्हणजे या प्रमाणपत्रावर लस घेतल्याची २८ एप्रिल २०२१ नमूद आहे. लसीकरण केंद्र मात्र डीईआयसी डीएच चंद्रपूर असे नमूद आहे. ही लस स्वाती जाधव या आरोग्य कर्मचारी महिलेने दिल्याचेही प्रमाणपत्रावर नमूद आहे. या केंद्रावर कुंदा देवराव दिवसे या महिलेच्या नावावर कुणीतरी लस घेतल्याचे स्पष्ट होते.

Shocking! The vaccine was given by another woman on the same Aadhaar number | धक्कादायक! एकीच्या आधार नंबरवर दुसऱ्याच महिलेने घेतली लस

धक्कादायक! एकीच्या आधार नंबरवर दुसऱ्याच महिलेने घेतली लस

ठळक मुद्देचंद्रपुरातील प्रकार : आधारकार्डधारक महिला वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या कोराेनावर मात करण्यासाठी लसीकरण जोरात सुरू आहे. कोरोनाचा प्रकोप पाहून लसीकरणाला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.  लसीकरणासाठी आधारकार्ड क्रमांक महत्त्वाचा मानला जात आहे. याद्वारे ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच लसीकरण करता येते. असे असताना चंद्रपुरात आधारकार्डवर भलत्याच महिलेने लस घेतल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यामुळे आधारकार्डधारक महिलेला मात्र लसीकरणापासून वंचित राहावे लागले. ही घटना कुंदा देवराव दिवसे या महिलेसोबत घडली. कुंदा दिवसे या वडगाव येथील गजानन महाराज मंदिरात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर पहिली लस घेण्यासाठी गेल्या होत्या. 
दरम्यान, त्यांनी नोंदणीकरिता आधारकार्ड क्रमांक सांगितला असता त्यांच्या नावाने आधीच कोविशिल्ड लस घेतल्याचे प्रमाणपत्र बघायला मिळाले. धक्कादायक बाब म्हणजे या प्रमाणपत्रावर लस घेतल्याची २८ एप्रिल २०२१ नमूद आहे. लसीकरण केंद्र मात्र डीईआयसी डीएच चंद्रपूर असे नमूद आहे. ही लस स्वाती जाधव या आरोग्य कर्मचारी महिलेने दिल्याचेही प्रमाणपत्रावर नमूद आहे. या केंद्रावर कुंदा देवराव दिवसे या महिलेच्या नावावर कुणीतरी लस घेतल्याचे स्पष्ट होते. ही बाब लक्षात येताच कुंदा दिवसे या महिलेने वडगाव केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना आपण लस घेतलीच नाही, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आज लस घेतली असती तर दंडावर खूण असती हेही सांगितले. मात्र प्रमाणपत्र असल्याने आता दुसऱ्या लसीकरणाच्या तारखेलाच या. तेव्हाच लस मिळेल, असे सांगण्यात आले. या धक्कादायक प्रकाराने कुंदा दिवसे या निराश होऊन घरी परतल्या.

 

Web Title: Shocking! The vaccine was given by another woman on the same Aadhaar number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.