धक्कादायक! चंद्रपूर जिल्ह्यात नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 13:05 IST2020-01-09T13:05:06+5:302020-01-09T13:05:28+5:30

नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिपरी तालुक्यातील धामणगाव शिवारात गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

Shocking! Nine-year-old school boy murdered in Chandrapur district | धक्कादायक! चंद्रपूर जिल्ह्यात नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा खून

धक्कादायक! चंद्रपूर जिल्ह्यात नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा खून

ठळक मुद्देगोंडपिपरी तालुक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिपरी तालुक्यातील धामणगाव शिवारात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी गोंडपिपरी पोलीस दाखल झाले असून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. उज्वल गेमाजी खेडेकार (9) असे मृत मुलाचे नाव आहे.
गोंडपिपरी तालूक्यात  धामणगाव येथील जिल्हा परिषद शाळे जवळ असलेल्या चिंचेचा झाडाखाली उज्वल गेमाजी खेडेकार या नऊ वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. उज्वलचा गळ्याला दूप्पटा आवळलेला होता. दरम्यान घटनेची माहीती गोंडपिपरी पोलीसांना देण्यात आली.घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करित आहेत.

Web Title: Shocking! Nine-year-old school boy murdered in Chandrapur district

टॅग्स :Murderखून