धक्कादायक! सेल्फी काढण्याच्या नादात चार युवक बुडाले; शोध मोहीम सुरू

By राजेश भोजेकर | Updated: July 16, 2023 19:19 IST2023-07-16T18:53:21+5:302023-07-16T19:19:40+5:30

ही घटना रविवारी १६ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता घडली.

Shocking! Four youths drowned in the noise of taking selfies; Start the search | धक्कादायक! सेल्फी काढण्याच्या नादात चार युवक बुडाले; शोध मोहीम सुरू

धक्कादायक! सेल्फी काढण्याच्या नादात चार युवक बुडाले; शोध मोहीम सुरू

चंद्रपूर-  येथील वरोरा तालुक्यातील शेगाव येथील चार तरुण घोडाझरी तलावात बुडाले. ही घटना रविवारी १६ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता घडली. या घटनेत मृतकांमध्ये, मनीष श्रीरामे (२६), धीरज झाडें (२७), संकेत मोडक (२५), चेतन मांदाडे (१७) यांचा समावेश आहे.

मिळालेली माहिती अशी, शेगाव येथील आठ युवक रविवारी पार्टीसाठी घोडझारी तलाव येथे आले होते. घोडाझरी तलाव परिसरात फिरल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात एक जण घसरून पडला त्याच्या पाठोपाठ तीन जण पडले. सोबतच्या चार सहकाऱ्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावसामुळे घोडझरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे त्यांचा पत्ता लागला नाही. सध्या शोध सुरु असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Web Title: Shocking! Four youths drowned in the noise of taking selfies; Start the search