धक्कादायक! १२१ कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST2021-03-17T04:28:50+5:302021-03-17T04:28:50+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २४ हजार ९६४ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ६६५ ...

Shocking! 121 corona positive, both die | धक्कादायक! १२१ कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

धक्कादायक! १२१ कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २४ हजार ९६४ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ६६५ झाली आहे. सध्या ८९५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ३५ हजार १९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख सात हजार ७६९ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये वरोरा तालुक्यातील निलजई येथील ८० वर्षीय वृद्ध व गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील ६३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०४ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३६५, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

चंद्रपुरात ६० नवे बाधित

आज बाधित आढळलेल्या १२१ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ६०, चंद्रपूर तालुका १३, बल्लारपूर ११, भद्रावती आठ, ब्रह्मपुरी एक, नागभीड तीन, मूल दोन, सावली एक, गोंडपिपरी तीन, राजुरा दोन, चिमूर पाच, वरोरा दोन, कोरपना नऊ व जिवती येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

Web Title: Shocking! 121 corona positive, both die