डिक्की उघडी ठेवून धावली ‘शिवशाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:42 IST2018-12-17T22:41:53+5:302018-12-17T22:42:12+5:30
शिवशाही बसमधील प्रवास सुरक्षीत असल्याचे मानले जाते. त्यामुळे तिकीट दर अधिक असतानाही शिवशाही बसमधून प्रवास करण्याकरिता प्रवाश्यांचा कल वाढला आहे. मात्र शिवशाही बसने मागील डिक्की उघडी ठेवतच चंद्रपूर-नागपूर प्रवास केला. यामध्ये प्रवाशांच्या सामनांबाबत वाहक चालक किती गंभीर असतात, असा प्रश्न प्रवाश्यांना पडत आहे.

डिक्की उघडी ठेवून धावली ‘शिवशाही’
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : शिवशाही बसमधील प्रवास सुरक्षीत असल्याचे मानले जाते. त्यामुळे तिकीट दर अधिक असतानाही शिवशाही बसमधून प्रवास करण्याकरिता प्रवाश्यांचा कल वाढला आहे. मात्र शिवशाही बसने मागील डिक्की उघडी ठेवतच चंद्रपूर-नागपूर प्रवास केला. यामध्ये प्रवाशांच्या सामनांबाबत वाहक चालक किती गंभीर असतात, असा प्रश्न प्रवाश्यांना पडत आहे.
खासगी बसेसना स्पर्धा करताना एसटी महामंडळ नावीन्यपूर्ण योजना राबवून प्रवाशांना एसटी बसमधून प्रवास करण्याकरिता आकर्षित करीत आहेत. स्पर्धेत आपणही मागे राहू नये याकरिता एसटी महामंडळाने वातानुकलीत शिवशाही बससेवा सुरु केली. शिवशाही बसची तिकीट अधिक असल्यामुळे सुरवातीला प्रवास टाळीत होते. परंतु, लांब पल्ल्याच्या शिवशाही बसला प्रवासी प्राधान्य देताना दिसत आहेत.
शिवशाही बस मध्ये जागा कमी असल्याने प्रवाश्यांचे साहित्य ठेवण्याकरिता मागील बाजूने डिक्की दिली आहे. या डिक्कीमध्ये प्रवाशांचे साहित्य व्यवस्थित व सुरक्षीत असते. त्यामुळे प्रवाशी बिनधास्त प्रवास करीत असतात. मात्र चंद्रपूरवरुन नागपूरकडे निघालेली शिवशाही बस मागील डिक्की उघडी ठेवून धावत वरोऱ्यापर्यंत व समोरही डिक्की उघडीच ठेवीत नागपूरकडे निघाली. यामध्ये अनेक प्रवाशांचे साहित्य असुरक्षीत राहिले.