शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
3
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
4
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
5
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
6
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
7
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
8
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात शिवसेनेचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:18 PM

कृषिपंपाला आठवड्यातून तीन दिवस रात्री थ्री फेज पुरवठा देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. रात्री ऐवजी दिवसा कृषिपंपांना थ्री फेज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात सोमवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन तास ठिय्या दिला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : कृषिपंपाला दिवसा वीज पुरवठा द्या, खंडित वीज पुरवठ्यामुळेही शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : कृषिपंपाला आठवड्यातून तीन दिवस रात्री थ्री फेज पुरवठा देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. रात्री ऐवजी दिवसा कृषिपंपांना थ्री फेज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात सोमवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन तास ठिय्या दिला.वरोरा तालुक्यातील खांबाडा व माढेळी येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमधून वीज पुरवठा करण्यात येतो. आठवड्यातील तीन दिवस रात्री १० ते ४ या काळात कृषिपंपांना थ्री फेज वीज पुरवठा देण्यात येतो. सदर पसिरारातील जंगलाला लागून शेती असल्याने रात्री वन्यप्राण्यांच्या भीतीने शेतकरी पिकांना पाणी देण्याकरिता शेतात जात नाही. सध्या सोयाबीनचे पीक निघाले असून शेतजमीन तयार करून दुसरे पीक घेण्याकरिता पाण्याची आवश्यकता आहे. असे असल्याने शेतकरी दुबार पीक घेऊ शकत नाही. कृषिपंपांना ज्यावेळी दिवसा थ्री फेज वीज पुरवठा दिला जातो, त्यात अनेकदा वीज पुरवठा खंडीत होत असतो तर कधी विजेचा दाब कमी होवून अनेक शेतकºयांच्या कृषीपंपाच्या मोटारी जळाल्या आहेत. त्यामुळे रात्री थ्री फेजचा वीज पुरवठा बंद करून सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत थ्री फेज वीज पुरवठा मिळावा, या मागणीकरिता वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्या कक्षात शिवसेनेने दोन तास ठिय्या मांडला. यावेळी बाजार समितीचे उपसभापती चिकटे, जामखुळाचे सरपंच पुरूषोत्तम पावडे, कामगार सेना वरोरा तालुका प्रमुख मनोज दानव, गजानन धोटे, अंबादास वावरे, संजय बोरकर, संदीप पावडे, अजाब पावडे, विजय पावडे व शेतकरी उपस्थित होते.कृषिपंपांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत थ्री फेज वीज पुरवठा मिळण्याबाबत शेतकºयांचे निवेदन प्राप्त झाले आहे. याबाबत अहवाल तत्काळ वरिष्ठ कार्यालयात पाठविणार आहे. वरिष्ठांचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना सांगू.-प्रशांत राठी, कार्यकारी अभियंतायुवासेनेचा उपविभागीय अभियंत्याला घेरावपोंभूर्णा : महावितरणचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी, व्यावसायिक व शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे. परतीच्या पावसाने दगा दिल्याने शेतकºयांनाही मोटारपंपाने दिवसरात्र पाणी करावे लागत आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे पिके करपली जात आहेत. सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालु असून वारंवार खंडीत होणाºया विद्युत पुरवठ्याने विद्यार्थीही त्रस्त झाले आहे. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी पोंभूर्णा येथील महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना सोमवारी घेराव घालत जाब विचारला.युवासेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे व उपजिल्हा प्रमुख आशिष कावटवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. वीज पुरवठा सुरळीत न केल्यास युवासेना, शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशाराही देण्यात आला. महावितरणच्या वतीने कृषीपंपधारक शेतकऱ्यांना अखंडीत वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र हे आश्वासन हवेतच विरले असून महावितरण शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप युवा सेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी केला आहे. कृषी पंपधारक शेतकऱ्यांना २४ तास विद्युत पुरवठा हे शासनाचे धोरण आहे. मात्र तालुक्यातील शेकडो शेतकरी यापासून वंचित आहेत. यावेळी विविध समस्या निराकरणासाठी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख सचिन भोयर, उप जिल्हा प्रमुख आशिष कावटवार, शिवसेना शहर प्रमुख गणेश वासलवार आदी उपस्थित होते.