लोकसेवकांच्या पुढाकारातून फुटणार शिवाराला ‘पाझर’

By Admin | Updated: May 27, 2017 00:39 IST2017-05-27T00:39:48+5:302017-05-27T00:39:48+5:30

वातावरणाचा बिघडत चाललेला समतोल यामुळे दिवसागणिक पावसाचे प्रमाण कमी होवू लागले आहे. तर वाढत्या उष्णतेमुळे जलसाठे कोरडे पडण्याचेही प्रमाण वाढले आहेत.

Shivar's 'Pakar' | लोकसेवकांच्या पुढाकारातून फुटणार शिवाराला ‘पाझर’

लोकसेवकांच्या पुढाकारातून फुटणार शिवाराला ‘पाझर’

एसडीओंचा पुढाकार : जांभुळघाट गावात वाढणार पाण्याची पातळी
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : वातावरणाचा बिघडत चाललेला समतोल यामुळे दिवसागणिक पावसाचे प्रमाण कमी होवू लागले आहे. तर वाढत्या उष्णतेमुळे जलसाठे कोरडे पडण्याचेही प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे गावा-गावात पाण्याचा दुष्काळ निर्माण होत आहे. या दुष्काळातून गावकऱ्यांची सुटका करण्यासाठी चिमूर येथील लोकसेवकांच्या पुढाकारातून जांभुळघाट येथील तळ्यातील गाळ उपसा करण्यासाठी चक्क लोकसेकांनी स्वत: वर्गणी गोळा करून कामाला सुरुवात केली. त्यामुळे आता जांभुळघाट येथील शिवारला पाझर फुटणार आहे.
महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वात जास्त धरण जलसाठे असलेले राज्य असून या धरणामध्ये दरवर्षी साचत चालेलेल्या गाळामुळे धरण, तलावाच्या पाणी साठवण क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे तलावातील गाळ काढून शेतकऱ्यांचा शेतात टाकण्यात येत आहे. त्या योजनेमुळे धरण तलाव याचा पाणी क्षमतेत वाढ होवून शेतकऱ्यांचा उत्पादनात वाढ होणार आहे. तसेच गावातील जलस्तर वाढून जणावरांना पिण्याचे पाणी मुबलक मिळण्यास उपयोग होणार आहे. त्यामुळेही योजना शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे.

Web Title: Shivar's 'Pakar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.