गडचांदुरातील शिवाजी चौकाचे होणार सौंदर्यीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:28 IST2021-03-05T04:28:22+5:302021-03-05T04:28:22+5:30

कोरपना : गडचांदूर येथील मध्यभागी असणाऱ्या शिवाजी चौकाचे सौंदर्यीकरण होणार असून, नगर परिषदेने यासाठी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर ...

Shivaji Chowk in Gadchandura will be beautified | गडचांदुरातील शिवाजी चौकाचे होणार सौंदर्यीकरण

गडचांदुरातील शिवाजी चौकाचे होणार सौंदर्यीकरण

कोरपना : गडचांदूर येथील मध्यभागी असणाऱ्या शिवाजी चौकाचे सौंदर्यीकरण होणार असून, नगर परिषदेने यासाठी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

अनेक वर्षांपासून हे सौंदर्यीकरण रखडले होते. बुधवारी नगराध्यक्ष सविता टेकाम यांच्या हस्ते सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून, यामुळे गडचांदूर शहराच्या सौंदर्यात मोलाची भर पडणार आहे.

यावेळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी, बांधकाम वित्त व नियोजन समिती सभापती कल्पना अरुण निमजे, आरोग्य व स्वच्छता समिती सभापतिपदी राहुल उमरे, गटनेते विक्रम येरणे, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, धनंजय छाजेड, अरविंद मेश्राम, जयश्री ताकसांडे, सागर ठाकुरवार, अरविंद डोहे, शेख सरवर शेख शालू, मीनाक्षी एकरे, सुनीता कोडापे व इतर नागरिक उपस्थित होते.

Web Title: Shivaji Chowk in Gadchandura will be beautified