वरोरा येथे शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST2021-04-03T04:24:11+5:302021-04-03T04:24:11+5:30

वरोरा : छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचेच नाही, तर संपूर्ण जगाचे मार्गदर्शक होते, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते ...

Shiva Jayanti celebrations at Warora | वरोरा येथे शिवजयंती साजरी

वरोरा येथे शिवजयंती साजरी

वरोरा : छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचेच नाही, तर संपूर्ण जगाचे मार्गदर्शक होते, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी शिवजयंतीच्या छोटेखानी कार्यक्रमात केले.

तिथीनुसार ३१ मार्च रोजी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोनाचे नियम पाळत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते, उपाध्यक्ष रमेश मेश्राम, तालुका प्रमुख मुकेश जीवतोडे, शहर प्रमुख संदीप मेश्राम, माजी नगरसेवक खेमराज कुरेकार, अनिल वरखेडे, नगरसेवक दिनेश यादव, नगरसेविका सुषमा भोयर, भूषण बुरीले यांची उपस्थिती होती. या प्रसंगी शिवसेनेच्या वतीने १२ शिलाई मशीनचे वाटपही केले, प्रास्ताविक मुकेश जीवतोडे यांनी केले, तर संचालन आणि आभार मनीष जेठानी यांनी केले.

Web Title: Shiva Jayanti celebrations at Warora