शिवसेनातर्फे राज्यस्तरीय मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

By Admin | Updated: July 2, 2016 01:10 IST2016-07-02T01:10:13+5:302016-07-02T01:10:13+5:30

शिवसेनेच्या सुवर्ण जयंती महोत्सव तसेच आमदार बाळू धानोरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून

Shiv Sena organizes state-level mini marathon competition | शिवसेनातर्फे राज्यस्तरीय मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

शिवसेनातर्फे राज्यस्तरीय मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

चंद्रपूर : शिवसेनेच्या सुवर्ण जयंती महोत्सव तसेच आमदार बाळू धानोरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्यावतीने ‘दौड स्वाभिमानाची’ या राज्यस्तरीय खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ४ जुलैला सकाळी ७ वाजता आयोजीत करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल धानोरकर यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
सदर स्पर्धा खुल्या गटाची असून या स्पर्धेत कोणत्याही वयोगटातील महिला व पुरुष भाग घेऊ शकतात. पुरुष गटाची स्पर्धा शनी मंदिर, मोरवा नागपूर रोड व महिला गटाची पडोली चौकामधून सदर स्पर्धेला सुरुवात होणार आहे. प्रत्येक विजेत्या गटातील महिला व पुरुषांना प्रत्येकी सात बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रथम बक्षीस २१ हजार, व्दितीय १५ हजार, तृतीय १० हजार, चतुर्थ बक्षीस ७ हजार, पाचवे बक्षीस ५ हजार, सहावे बक्षीस ३ हजार, सातवे बक्षीस २ हजार रुपय रोख देण्यात येणार आहेत. स्पर्धेला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री दादाजी भुसे, आमदार बाळू धानोरकर, मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यवतमाळचे शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर आदी मान्यवर स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवणार आहेत. सदर स्पर्धेच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम गांधी चौकात घेतला जाणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाध्यक्ष बाळू धानोकर, सतीश भिवगडे यांनी पत्रकार परिषदेत केले. (नगर प्रतिनिधी )

Web Title: Shiv Sena organizes state-level mini marathon competition