शिवसैनिकांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिल्या कोंबड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:30 IST2021-08-26T04:30:40+5:302021-08-26T04:30:40+5:30

वरोरा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने वरोरा शहरात शिवसेनेचे ...

Shiv Sainiks gave hens to BJP office bearers | शिवसैनिकांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिल्या कोंबड्या

शिवसैनिकांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिल्या कोंबड्या

वरोरा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने वरोरा शहरात शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी ना. राणे यांचा निषेध व्यक्त करीत भाजपा पदाधिकाऱ्यांना कोंबड्या भेट म्हणून दिल्या.

शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मते यांच्या मार्गदर्शनात वरोरा शहरात शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात व्यक्त केला. त्यानंतर वरोरा शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांना कोंबड्या भेट देऊन निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम, शिवसेना वर्धा तालुका प्रमुख मुकेश जीवतोडे, शिवसेना जिल्हा चिटणीस मनीष जेठाणी, शिवसेना शहर प्रमुख संदीप मेश्राम, युवा सेना तालुका प्रमुख भूषण बुरीले, उपशहर प्रमुख मनीष धोतरे, शहर प्रमुख गणेश जानवे, अनिल घाडगे, महिला आघाडी उपतालुका संघटिका रजनी मेश्राम, उपशहर संघटिका अलका पचारे, सोहेल शेख आदी उपस्थित होते.

250821\img_20210825_104041.jpg

warora

Web Title: Shiv Sainiks gave hens to BJP office bearers