‘चिंधी बाजार’ ने राज्य नाटय महोत्सवाची सुरुवात
By Admin | Updated: July 3, 2014 23:29 IST2014-07-03T23:29:33+5:302014-07-03T23:29:33+5:30
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ५३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचा भाग म्हणून प्रथम पारितोषिक विजेत्या नाटक महोत्सवाचे व नाट्य संग्रहाच्या उत्कृष्ट छायाचित्रांच्या प्रदर्शनीचे स्थानिक

‘चिंधी बाजार’ ने राज्य नाटय महोत्सवाची सुरुवात
चंद्रपूर : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ५३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचा भाग म्हणून प्रथम पारितोषिक विजेत्या नाटक महोत्सवाचे व नाट्य संग्रहाच्या उत्कृष्ट छायाचित्रांच्या प्रदर्शनीचे स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात बुधवारी सायंकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पटकथा लेखक संजय पवार, मच्छिंद्र पाटील, विलास बोझलवार, सदानंद बोरकर व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.
या राज्य नाट्य महोत्सवाच्या सुरुवातीला हेमंत मानकर लिखित, जयश्री कापसे-गावंडे दिग्दर्शीत चिंधी बाजार नाटक नवोदिता चंद्रपूर या संस्थेतर्फे सादर करण्यात आले. ४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता अंतिम संगीत नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेते नाटक संगीत संशयकल्लोळ खल्वायन रत्नागिरी ही संस्था सादर करणार आहे. ५ जुलै रोजी दुपारी २ वाजता अंतिम संस्कृत नाट्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेते नाटक माधवीयम हे नाटक रामनारायण रुईया महाविद्यालय मुंबई ही संस्था सादर करणार आहेत. तसेच सायंकाळी ७ वाजता व्यावसायिक नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेते नाटक ठष्ट हे नाटक अश्वमी आणि अद्वैत थिएटर मुंबई ही संस्था हे सादर करणार आहे.
६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात राज्य नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री संजय देवतळे, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री फौजिया खान यांच्या उपस्थितीत होईल.(प्रतिनिधी)