शिंदे महाविद्यालयाला कलर कोट विद्यार्थ्यांचा मान

By Admin | Updated: May 8, 2016 00:53 IST2016-05-08T00:53:10+5:302016-05-08T00:53:10+5:30

स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील एकुण ३६ विद्यार्थ्यांची २०१५-१६ या सत्रात आॅल इंडिया विद्यापीठ व अश्वमेध खेळाकरिता निवड झाली आहे.

Shinde College values ​​students of color coatings | शिंदे महाविद्यालयाला कलर कोट विद्यार्थ्यांचा मान

शिंदे महाविद्यालयाला कलर कोट विद्यार्थ्यांचा मान

भद्रावती : स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील एकुण ३६ विद्यार्थ्यांची २०१५-१६ या सत्रात आॅल इंडिया विद्यापीठ व अश्वमेध खेळाकरिता निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी विविध राज्यात आपल्या खेळाचे उत्कृष्ठ प्रदर्शन दाखविले. तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीमधून सन २०१५-१६ मध्ये सर्वात जास्त कलर कोट विद्यार्थी झाल्याचा मान महाविद्यालयाला मिळाला आहे.
या खेळाडूंचा शिक्षण संस्थेचे सचिव व माजी आमदार निळकंठराव शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ब्लेझर देऊन गुरुवारी सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त डॉ. विवेक शिंदे, डॉ. कार्तिक शिंदे, दिलीप शिंदे, प्राचार्य डॉ. एल.एस. लडके, डॉ. विशाल शिंदे, उपप्राचार्य डॉ. नरेंद्र हरणे, डॉ. शशिकांत शित्रे, डॉ. नासरे, प्रा. प्रधान, अजय आसुटकर, विशाल गौरकार, अजिज शेख व इतर प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

भद्रावती-वरोरा तालुक्यात प्रथमच इतक्या जास्त प्रमाणात खेळाडू आॅल इंडिया स्तरावर लागण्याचा बहुमान महाविद्यालयाला मिळाला. यात व्हॉलीबाल खेळाडू- अक्षय पोहाणे, विनोद काळे, निलेश घोटेकर, अश्विनी खाडे, प्रियंका ढोके, कबड्डी-स्वप्नी पत्तीवार, खो-खो- प्रदिप देवतळे, तायकांडो- मोहित बुरा, राकेश चटपल्लीवार, तुषार दुर्गे, शुभम केळझरकर, अमलोश कुमरमेघा रणदिवे, अंजली मोगरे, ज्युडो- सुरज बांदुरकर, तुषार दुर्गे, शुभम केळझरकर, हॉकी - केतन तिडके, आर्चरी- अक्षय सातपुते, स्मिता जेणेकर, सर्कल कबड्डी- राहुल बोरकर, निखील महाजन, क्रिकेट- प्रसाद पांडे, तलवारबाजी- सुरज दखणे, नुभय शेंडे, दीपक कावटे, अक्षय सातपुते, तृणाल उंबरकर, स्मिता जेणेकर, पायल कोल्हे, तृशाली बोंडे, मनीषा ताजने, रश्मी पेटकर यांचा समावेश आहे.

Web Title: Shinde College values ​​students of color coatings