शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

ढोल ताशात आज श्रीला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:02 PM

१२ दिवसांच्या सेवेनंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी भव्य मिरवणुकीद्वारे गणरायाला निरोप दिला जाणार आहे. या मिरवणुकीसाठी पोलीस विभाग आणि महानगरपालिका व जिल्हा प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज झाले आहे. यादरम्यान कुठलीही अनूचित घटना घडू नये, यासाठी पोलीस विभागाने बाहेर जिल्ह्यातूनही अतिरिक्त कुमक बोलाविली आहे. रामाळा व दाताळा मार्गावरील इरईचे पात्र हे विसर्जनस्थळ असल्याने तिथे विजेची व्यवस्था, स्वच्छता, निर्माल्यकुंड व कृत्रिम तलावांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपोलिसांची करडी नजर महापालिका सज्ज गणेशभक्तांमध्ये उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १२ दिवसांच्या सेवेनंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी भव्य मिरवणुकीद्वारे गणरायाला निरोप दिला जाणार आहे. या मिरवणुकीसाठी पोलीस विभाग आणि महानगरपालिका व जिल्हा प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज झाले आहे. यादरम्यान कुठलीही अनूचित घटना घडू नये, यासाठी पोलीस विभागाने बाहेर जिल्ह्यातूनही अतिरिक्त कुमक बोलाविली आहे. रामाळा व दाताळा मार्गावरील इरईचे पात्र हे विसर्जनस्थळ असल्याने तिथे विजेची व्यवस्था, स्वच्छता, निर्माल्यकुंड व कृत्रिम तलावांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.१३ सप्टेंबर मोठ्या उत्साहात जिल्हाभर गणरायाची स्थापना करण्यात आली. चंद्रपूर शहरात शंभराहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री ची स्थापना केली. गणराया नागरिकांच्या घरोघरी व वॉर्डावॉर्डात असल्याने सर्वत्र भक्तीचे वातावरण पसरले होते.रविवारी अनंत चतुर्दशी आहे. यावेळी गणरायाला निरोप दिला जाणार आहे. दाताळा मार्गावरील इरई नदीचे पात्र व रामाळा तलाव हे चंद्रपुरातील विसर्जनस्थळ आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या स्थळांची स्वच्छता केली असून त्या ठिकाणी कृत्रिम तलाव, निर्माल्य कुंड व आपातकालीन व्यवस्थेसाठी विसर्जनस्थळीच मंडप उभारले आहे.जिल्हा प्रशासनानेही सर्व तयारी केली असून विसर्जन मिरवणुकीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मचानी उभारण्यात आल्या आहेत. गांधी चौकात व जटपुरा गेटवरून मिरवणुकीतील गणेशमूर्तीवर फुलांचा वर्षाव केला जातो. याचीही तयारी पूर्ण झाली आहे. दुसरीकडे रविवारी मिरवणुकीसाठी गणेशभक्तांमध्ये उत्साह आहे.या ठिकाणी आहेत कृत्रिम तलावमहानगरपालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी कृत्रिम तलाव तसेच निर्माल्य कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यात रामाळा तलाव परिसरात चार, गांधी चौक परिसरात एक, शिवाजी चौक परिसरात दोन , दाताळा रोड इरई नदी दोन , पं. दिनदयाल उपाध्याय तुकूम प्रा. शाळा परिसरात दोन, झोन क्र. ३ कार्यालय परिसरात एक, नेताजी चौक बाबुपेठ परिसरात दोन, बंगाली कॅम्प झोन आॅफिस जवळ एक, विठोबा खिडकी विठ्ठल मंदिर वॉर्ड परिसरात एक, शिवाजी चौक परिसरात दोन, लोकमान्य टिळक प्रा. शाळा पठाणपुरा रोड परिसरात एक, नटराज टॉकीज ताडोबा रोड परिसरात दोन इत्यादी ठिकाणी कृत्रिमतलाव तसेच निर्माल्य कलश निर्माण करण्यात आले आहेत. या ठिकाणी वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, विद्युत व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रामाला तलाव हे विसर्जनाचे मुख्य केंद्र असल्याने येथे महानगरपालिकेचे सफाई कामगार तीन शिफ्टमधे कार्यरत असणार आहेत.वैद्यकीय पथक तैनातविसर्जनस्थळांवर विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच इथे प्रथमोपचार कक्षदेखील स्थापन करण्यात येणार आहे. महत्वाच्या विसर्जनस्थळी रुग्णवाहिकांसह डॉक्टर्स, परिचारिका, आवश्यक औषणांचा साठा, अग्निशमन दलाच्या गाड्या सज्ज ठेवल्या जाणार आहेत. उर्वरित ठिकाणी डॉक्टरांसह परिचारिका आणि कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.१८ चौकात ९० कॅमेरेशहरात सध्या १८ चौकात सुमारे ९० कॅमेरे कार्यरत असून त्याद्वारे चंद्रपूर पोलीस शहरातील सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवतात. सदर कॅमेराकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे. या ठिकाणच्या कॅमेऱ्यांचे फुटेज वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या मोबाईलमध्ये लाईव्ह दिसणार आहे. जेणेकरून वरिष्ठ अधिकारी कुठल्याही ठिकाणावरून कुठलेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्वत: चेक करू शकतात.असा आहे पोलीस बंदोबस्तपोलीस विभागाने बंदोबस्ताकरिता एक अप्पर पोलीस अधीक्षक, तीन पोलीस उपअधीक्षक, ११ पोलीस निरीक्षक, ६१ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ८०० पोलीस कर्मचारी, दंगा नियंत्रक पथक, नक्षल विरोधी अभियान पथके, २०० गृहरक्षक आणि २०० पोलीस मित्रांनाही सज्ज केले आहे. ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याकरिता ध्वनी प्रदूषण प्रतिबंध पथके आवश्यक यंत्रणेसह नेमण्यात आले आहे.तलाव, खाडीतील विसर्जनस्थळापूर्वी बांबूचे कुंपणमच्छिमार संघटनेचे स्वयंसेवक, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे जवान तैनातआरती व मूर्ती ठेवण्यासाठी विसर्जनस्थळाजवळ टेबलाची सोयविद्युत व्यवस्थेसह जनरेटरपिण्याचे पाणी आणि वैद्यकीय व्यवस्थाभाविकांच्या स्वागतासाठी मंच, सूत्रसंचालक, आणि सूचनाशहरातील साथीच्या आजारांना रोखण्यासाठी फलकाद्वारे प्रबोधननिर्माल्य वाहून नेण्याची स्वतंत्र व्यवस्था