सावलीत आरक्षण हक्क कृती समितीची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:20 AM2021-06-26T04:20:14+5:302021-06-26T04:20:14+5:30

सावली : रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली येथे आरक्षण हक्क कृती समिती मार्फत ‘पदोन्नतीत आरक्षण’ यासंदर्भात जनजागृती सभेचे ...

Shadow Reservation Right Action Committee Meeting | सावलीत आरक्षण हक्क कृती समितीची सभा

सावलीत आरक्षण हक्क कृती समितीची सभा

Next

सावली : रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली येथे आरक्षण हक्क कृती समिती मार्फत ‘पदोन्नतीत आरक्षण’ यासंदर्भात जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले.

७ मे २०२१ ला पदोन्नतीतील आरक्षण नाकारणारा जीआर काढून महाराष्ट्र शासन मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या मुळावर उठले आहे. हा अन्यायकारक शासन निर्णय मागे घेऊन पूर्ववत पदोन्नतीत आरक्षण लागू करावे. या प्रमुख मागणीसह १६ मागण्या मान्य करण्यासाठी शासनाच्या दडपशाही धोरणाविरोधात २६ जून २०२१ ला आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून राज्यभर जिल्हा व मंत्रालयीन स्तरावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेला आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य निमंत्रक प्रा. राजकुमार जवादे ,ॲड. रवींद्र मोटघरे, टेंभरे यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रा. जवादे यांनी जिल्हा स्तरावर होणाऱ्या २६ जूनच्या आंदोलनात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन केले. सोबतच प्रा. विजय गायकवाड, प्रा. पुरुषोत्तम कन्नाके यांनी आरक्षणासंदर्भात वर्तमान परिस्थितीवर भाष्य करून दशा व दिशा मांडली. सभेला बसपाचे जिल्हा संयोजक मुकद्दर मेश्राम, ॲड. पी. पी. शेंडे, घनश्याम मेश्राम , संतोष दळांजे, महादेव लाकडे, अनंता दुधे, कमलनयन बोरकर, लक्ष्मण दुबे, रुपचंद थोरात, सुनील चुनारकर, सुमित बोरकर, आस्तिक दुधे, सुशील बोरकर, अनिल मेश्राम, संदीप गेडाम, धम्मा भेले, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Shadow Reservation Right Action Committee Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.