मुद्देमालासह साडेसात लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:46 IST2018-06-10T23:46:15+5:302018-06-10T23:46:23+5:30

वाहनातून चंदनखेडा मार्गे भद्रावतीला दारूची वाहतूक होत असताना भद्रावती पोलिसांनी पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. यातील चालक पसार झाला असून वाहनासह देशी दारू असा सात लाख ५० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.

Seven million liquor seized with issue | मुद्देमालासह साडेसात लाखांची दारू जप्त

मुद्देमालासह साडेसात लाखांची दारू जप्त

ठळक मुद्देआरोपी पसार : भद्रावती पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : वाहनातून चंदनखेडा मार्गे भद्रावतीला दारूची वाहतूक होत असताना भद्रावती पोलिसांनी पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. यातील चालक पसार झाला असून वाहनासह देशी दारू असा सात लाख ५० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
एमएच ४० बीजी ०६७४ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने चंदनखेडा मार्गे भद्रावतीला दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे नाकाबंदी केली असता, वाहनचालकाने पळ काढला. तेव्हा वाहनाचा पाठलाग करून पिर्ली फाट्याजवळ पकडण्यात आले. मात्र चालक पसार झाला. या वाहनातून तीन लाख ५० हजाराचा देशी दारू साठ्यासह वाहन ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई ठाणेदार बी.डी. मडावी, पीएसआय महेंद्र इंगळे, किशोर मित्तरवार, नरेश शेरकी, राजेश वºहाडे, सचिन गुरनुले, हेमराज प्रधान, भीमराव पडोळे, शशांत बादमवार यांनी केली.

Web Title: Seven million liquor seized with issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.