बल्लारपुरातील वस्ती विभागाला मिळणार २४ तास पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST2020-12-22T04:27:33+5:302020-12-22T04:27:33+5:30

शहरवासीयांना २४ तास पाणी देण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत वाढीव पाणी पुवठा योजना मंजूर करण्यात आली. जीवन ...

The settlement department in Ballarpur will get water 24 hours a day | बल्लारपुरातील वस्ती विभागाला मिळणार २४ तास पाणी

बल्लारपुरातील वस्ती विभागाला मिळणार २४ तास पाणी

शहरवासीयांना २४ तास पाणी देण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत वाढीव पाणी पुवठा योजना मंजूर करण्यात आली. जीवन प्राधिकरण द्वारे मागील एक वर्षांपासून शहरातील ३२ वार्डात नवीन जलवाहिन्या टाकणे व जोडणे सुरु आहे. हे काम पूर्णत्वास आले आहे. कोरोना संकटात डेपो विभागात नगर परिषद जवळून तर बीटीएस प्लॉटपर्यंत पाईप लाईन टाकण्याच्या कामाला विलंब झाला. बांधकाम विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे पेंडिंग पडले आहे. तेही लवकरच पूर्ण होणार, अशी माहिती नगर परिषद पाणी पुरवठा विभागाचे सुजित खामनकर यांनी दिली. वर्धा नदी काठावर जीवन प्राधिकरणाची पाणी उपसा करण्याची यंत्रणा बसविण्यात आली. मागील दहा दिवसांपासून पंपाची दुरूस्ती नागपूर येथील पथक करीत आहे. त्यामुळे वस्ती व टेकडी विभागात एक दिवसाआड वेळेपेक्षा जास्त पाणी पुरवठा सुरु राहणार असल्याची सूचना नळधारकांना देण्यात आली.

कोट

वस्ती विभागातील लोकसंख्या साधारण ५० हजारांच्या घरात आहे, याचा फायदा वस्ती विभागातील ४ प्रभागातील भगतसिंग वार्ड,टिळक वार्ड,सुभाष नगर,सरदार पटेल, डॉ.आंबेडकर वार्ड, राणी लक्ष्मीबाई नगर,किल्ला वार्ड, श्रीराम वार्ड व सिद्धार्थ वार्डातील नळ ग्राहकांना होणार आहे.

-गणेश बहुरिया, नगरसेवक,बल्लारपूर.

Web Title: The settlement department in Ballarpur will get water 24 hours a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.