संजय गांधी निराधार योजनेच्या १०३ प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:25 IST2021-03-07T04:25:20+5:302021-03-07T04:25:20+5:30

संजय गांधी निराधार योजनेची पहिली सभा तहसील कार्यालय येथे घेण्यात आली. या सभेत १८४ लाभार्थ्यांचे प्रकरण मंजुरीसाठी ठेवण्यात ...

Settlement of 103 cases of Sanjay Gandhi Niradhar Yojana | संजय गांधी निराधार योजनेच्या १०३ प्रकरणांचा निपटारा

संजय गांधी निराधार योजनेच्या १०३ प्रकरणांचा निपटारा

संजय गांधी निराधार योजनेची पहिली सभा तहसील कार्यालय येथे घेण्यात आली. या सभेत १८४ लाभार्थ्यांचे प्रकरण मंजुरीसाठी ठेवण्यात आले. त्यामध्ये १०३ लाभार्थी हे पात्र ठरले तर ७७ लाभार्थ्यांचे प्रकरण कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने प्रलंबित ठेवण्यात आले व त्या लाभार्थ्यांचे प्रकरण नामंजूर करण्यात आले. तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे १९४८ लाभार्थी आहेत तर श्रावणबाळ योजनेचे सहा हजार ४३४ लाभार्थी आहेत. एकूण लाभार्थी संख्या ८ हजार ३८२ प्रकरणे आहेत. तहसील कार्यालयातर्फे प्रत्येक मंजूर झालेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दर महिन्याला हजार रुपये जमा केले जातात. या विविध योजनांमुळे परिसरातील विधवा, रोगग्रस्त, घटस्फोटित वृद्ध व्यक्तींना मोठा आधार मिळाला आहे. सभेला संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष साईनाथ शिंदे, तहसीलदार आरती रांकर, सदस्य विनायक बुरांडे, विजय ढोंगे, गुरुदेव मडावी, विजय मानकर, अनिता झाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Settlement of 103 cases of Sanjay Gandhi Niradhar Yojana