सेवा पुस्तके अद्ययावत करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:52 IST2020-12-17T04:52:14+5:302020-12-17T04:52:14+5:30

चंद्रपूर : जि. प. प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षकांचे सेवा पुस्तक अद्यावत करावे व अन्य प्रलंबित मागण्या सोडविण्याची मागणी राज्य ...

Service books should be updated | सेवा पुस्तके अद्ययावत करावे

सेवा पुस्तके अद्ययावत करावे

चंद्रपूर : जि. प. प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षकांचे सेवा पुस्तक अद्यावत करावे व अन्य प्रलंबित मागण्या सोडविण्याची मागणी राज्य शिक्षक परिषद प्राथमिक तालुका शाखा बल्लारपूरच्या शिष्टमंडळाने

संवर्ग विकास अधिकारी ताजने साहेब व गटशिक्षणाधिकारी वर्षा फुलझले यांच्याकडे निवेदनातून केली.

सेवा पुस्तक अद्यावत करण्यासाठी कॅम्प लावावे, प्राथमिक शिक्षकांना गोपनीय अहवाल द्यावे. सहाय्यक शिक्षिका मेश्राम सप्टेंबर व ऑक्टोबरचे थकीत वेतन काढावे, सन २०१९-२० च्या जीपीएफ पावत्या द्यावे, मासिक वेतन बिल पीडीएफ केंद्राच्या व्हाॅट्सॲप समूहावर टाकावे, उत्पन्न कर अर्ज १६ सर्व शिक्षकांना देण्याची मागणी शिक्षकांनी दिली. यावेळी कक्ष अधीक्षक चायकाटे, शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाह अमोल देठे, तालुका अध्यक्ष विकास कूळसंगे, सतिश दुवावार आदी उपस्थित होते.

Web Title: Service books should be updated