चंदनखेडा येथे २५ खाटांचे विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:46 IST2021-05-05T04:46:33+5:302021-05-05T04:46:33+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून याचा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे अनेक ...

चंदनखेडा येथे २५ खाटांचे विलगीकरण कक्ष
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून याचा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. याचीच दखल घेत खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या सहकार्यातून ग्राम पंचायत चंदनखेडा यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये २५ खाटांचे कोविडचे विलगीकरण कक्ष उभारण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील कोविड रुग्णांना उपचार घेणे शक्य होईल. या कोविड कक्षाची सोमवारी तहसीलदार महेश सितोडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आसुटकर, गटविकास अधिकारी डॉ. मंगेश आरेवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यावेळी चंदनखेडाचे सरपंच नयन जांभुळे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रेहान देशमुख, चंदनखेड्याचे माजी सरपंच सुमित मुडेवार उपस्थित होते.