समाजाच्या जडणघडणीत ज्येष्ठ नागरिकांचे मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:34 IST2017-10-01T23:34:26+5:302017-10-01T23:34:59+5:30

ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाºयांना गेल्या वर्षी दिलेला शब्द आपण पूर्ण केल्याचा आज मनापासून आनंद होत आहे . ज्येष्ठ नागरिकांचे समाजाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे.

 Senior contribution of senior citizens in the formation of society | समाजाच्या जडणघडणीत ज्येष्ठ नागरिकांचे मोठे योगदान

समाजाच्या जडणघडणीत ज्येष्ठ नागरिकांचे मोठे योगदान

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अमृत महोत्सवी सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाºयांना गेल्या वर्षी दिलेला शब्द आपण पूर्ण केल्याचा आज मनापासून आनंद होत आहे . ज्येष्ठ नागरिकांचे समाजाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. ज्येष्ठ नागरिक संस्कार केंद्र असल्याची भावना वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपूर द्वारा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त अमृत महोत्सवी सत्कार व रुग्णवाहिकेचा लोकार्पण साहेळा कार्यक्रम शनिवारी पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात संध्यापर्व २०१७ या स्मरणीकेचे विमोचन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय चंदावार, प्रमुख पाहूणे म्हणून आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, उपमहौपर अनिल फुलझेले, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

Web Title:  Senior contribution of senior citizens in the formation of society