माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारीवर परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:25 IST2021-03-07T04:25:42+5:302021-03-07T04:25:42+5:30

बल्लारपूर : येथील नाट्यगृह कलामंदिर येथे जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारी यावर संवाद ...

Seminar on my work area my responsibilities | माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारीवर परिसंवाद

माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारीवर परिसंवाद

बल्लारपूर : येथील नाट्यगृह कलामंदिर येथे जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारी यावर संवाद कार्यक्रम तहसील कार्यालय बल्लारपूर, नगर परिषद आणि संवर्ग विकास अधिकारी, बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

या संवाद कार्यक्रमात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, नगराध्यक्ष हरीश शर्मा, इंदिरा पिपरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी बल्लारपूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांना सूचना केली. कोविड-१९ च्या दुस-या लाटेची शक्यता लक्षात घेता आपापल्या क्षेत्रातील सर्व नागरिकांना कोविड-१९ च्या त्रिसूत्रीचे पालन करण्यासाठी सर्वतोपरी प्रवृत्त करावे, जनजागृती करावी, असे आवाहन केले. संचालन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले. आभार तहसीलदार संजय राईंचवार यांनी मानले.

Web Title: Seminar on my work area my responsibilities