विदर्भ राज्य निर्मितीसाठी आत्मक्लेश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:22+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करून जनतेला न्याय द्यावा आणि प्रमुख समस्या तातडीने सोडवाव्या, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने मंगळवारी चंद्र्रपूर, राजुरा, ब्रह्मपूरी, कोरपना, गोंडपिपरी, जिवती, भद्रावती, मूल, सावली या तालुक्यात एक दिवशीय आत्मक्लेश आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी स्थानिक तहसीलदारांकडे निवेदन सादर करून सरकारचे लक्ष वेधले.

विदर्भ राज्य निर्मितीसाठी आत्मक्लेश आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करून जनतेला न्याय द्यावा आणि प्रमुख समस्या तातडीने सोडवाव्या, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने मंगळवारी चंद्र्रपूर, राजुरा, ब्रह्मपूरी, कोरपना, गोंडपिपरी, जिवती, भद्रावती, मूल, सावली या तालुक्यात एक दिवशीय आत्मक्लेश आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी स्थानिक तहसीलदारांकडे निवेदन सादर करून सरकारचे लक्ष वेधले.
गोंडपिपरी येथे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयापुढे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. आंदोलनात समितीचे तालुकाध्यक्ष अरूण वासलवार, तुकेश वानोडे, व्यंकटेश मल्लेलवार, भारत खामनकर, अॅड. प्रफुल्ल आस्वले, रमेश घुडसे, सुधीर फुलझेले, राजेश कवठे, खेत्री, वागदरकर, श्रीराम काळे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. यावेळी अॅड. चटप यांनी विदर्भातील जनतेला न्याय मिळावा, म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्य मिळविण्यासाठी युवकांसह अथक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. राजुरा येथील आंदोलनात अनिल ठाकुरवार, पंढरी बोंडे, कवडू पोटे, नारायण गड्डमवार, रमेश नळे, कपील इद्दे, मधुकर चिंचोलकर, सतय्या रामगिरवार, हरीदास बोरकुटे, शेषराव बोंडे, नानाजी पोटे, प्रभाकर ढवस, प्रशांत माणूसमारे, दिलीप डेरकर, सुरज जिवतोडे, केतन जुनघरे आणि जिवती येथे निळकंठ कोरांगे, अॅड. श्रीनिवास मुसळे, ईस्माइल, सायसराव कुंडगीर, देविदास वारे, मच्छिंद्र मानकर, बळीराम पवार आदींनी भाग घेतला. चंद्र्रपूर येथे समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार, मितीन भागवत, दिवाकर मानुसमारे, गोपी मित्रा, मदन खामनकर आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढे आंदोलन करुन जनतेचे लक्ष वेधले. ब्रह्मपूरी येथे सुदर्शन राठोड, नंदगिरवार तर कोरपना येथे प्रभाकर दिवे, अरूण नवले, रमाकांत मालेकर, बंडू राजुरकर व भद्रावती येथे सुधीर सातपूते, सरपटवार, राजु बोरकर, प्रकाश आस्वले यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. मूल येथे कवडू येनप्रेडीवार आणि सावली येथे मनोहर गेडाम, रायपूरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या
विदर्भातील ११ जिल्ह्यातील १२० तालुक्यांचे नागपूर राजधानीसह स्वतंत्र विदर्भ राज्य तातडीने निर्मान करावे, शासनाने घरगुती,व्यावसायिक व औद्योगिक वापराचे विजबिल निम्मे करावे, ओला दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज व विजबिल रद्द करावे, साप हा वन्यप्राणी असल्याने इतर वन्य प्राण्यांप्रमाणे साप चावून होणाºया मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घ्यावा, ग्रामीण भागातील भारनियमन बंद करावे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.