प्रलय म्हशाखेत्रीची राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:23 IST2021-01-15T04:23:25+5:302021-01-15T04:23:25+5:30

चंद्रपूर: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूरतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध ...

Selection of Pralay Mhasakhetri for State Level Essay Competition | प्रलय म्हशाखेत्रीची राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवड

प्रलय म्हशाखेत्रीची राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवड

चंद्रपूर: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूरतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रलय म्हशाखेत्रीने यश मिळविले आहे. त्याने भारतीय स्त्रीवादी विचारवंत सावित्रीबाई फुले या विषयावर निबंध लिहिला. सदर स्पर्धेचा निकाल जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून घोषित करण्यात आला. यात प्रलयने द्वितीय क्रमांक पटकावला व त्याची राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवड झाली आहे. निबंध स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा प्रजासत्ताक दिनी होणार आहे.

या यशाबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.सतीश मालेकर, राजेश पोलेवार, प्रा.अनिल डहाके, व्हीबीव्हीपीचे जिल्हाध्यक्ष मयूर पाऊणकर, खुशाल काळे, सूरज दहागावकर, विक्रांत टोंगे, प्रा.महेश बावणे, अक्षय लोणारे, खेमराज हिवसे, साहिल जुमडे, बाबा भसारकर, विपुल धोटे, सुग्रीव मोरे, गजानन सावलीकर, बंडू मोहितकर, ताराचंद धोपटे, महेश मालेकर, खिल्लारे आदी उपस्थित होते.

Web Title: Selection of Pralay Mhasakhetri for State Level Essay Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.