स्वीकृत सदस्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 22:55 IST2018-10-06T22:54:55+5:302018-10-06T22:55:14+5:30
भद्रावती नगरपालिकेच्या तीन स्वीकृत सदस्यांची तथा उपाध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी पार पडली. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी १७ मते घेवून निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या सरिता सूर यांना सात मते मिळाली. चार सदस्य तटस्थ राहिले.

स्वीकृत सदस्यांची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : भद्रावती नगरपालिकेच्या तीन स्वीकृत सदस्यांची तथा उपाध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी पार पडली. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी १७ मते घेवून निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या सरिता सूर यांना सात मते मिळाली. चार सदस्य तटस्थ राहिले.
नामनिर्देशित सदस्यांमधून शिवसेना गटातून दोन, भारिप बहुजन महासंघ गटातून एक व भाजपातून एक नाव प्राप्त झाले होते. नियमानुसार स्विकृत सदस्यांमधून शिवसेनेच्या कोट्यातून दोन सदस्य निवडून आले. मनिष सारडा व जावेद शेख यांची शिवसेना गटातून वर्णी लागली. भारिप बहुजन महासंघ व भाजपा तौलनिक संख्याबळ समान असल्याने त्यांच्याकडून प्राप्त स्विकृत सदस्यांच्या नावांच्या चिठ्ठया टाकण्यात आल्या. ईश्वरचिठ्ठीने भारिप बहुजन महासंघाच्या सुशिल देवगडे यांची निवड झाली. प्रतिस्पर्धी म्हणून भाजपातर्फे लता भोयर स्विकृत सदस्यासाठी निवडणूक रिंगणात होत्या. भारिपला कॉंग्रेस गटाने समर्थ दिले होते. परंतु अशा प्रकारची तरतूद नसल्याने ईश्वर चिठ्ठी टाकण्यात आली. सदर निर्णय पीठासीन अधिकारी अनिल धानोरकर यांनी घेतला.