शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

नवचेतना मिशनसाठी ५५ शाळांची निवड

By admin | Updated: September 28, 2015 01:16 IST

मिशन नवचेतनांतर्गत नागभीड तालुक्यातील ५५ शाळा श्रेणीत आणण्याचा निर्धार येथील शिक्षण विभागाने केला आहे.

नागभीड : मिशन नवचेतनांतर्गत नागभीड तालुक्यातील ५५ शाळा श्रेणीत आणण्याचा निर्धार येथील शिक्षण विभागाने केला आहे. नागभीड तालुक्यात एकूण ११२ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत. यापैकी या प्रकल्पासाठी ५५ शाळांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमात मुलांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी खेळ व शिक्षण, मुलांचे वाचनालय, आदर्श चेतना शाळा, कौशल्य विकसन शिबिर, शिक्षकांसाठी नवरत्न स्पर्धा, स्वच्छ व सुंदर आदर्श शाळा तयार करणे, ई-लर्निंग व दत्तक शाळा योजना आदी योजना या शाळांत राबविण्याचा निर्धार शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी राजुली (बोंड), सावर्ला, टेकरी, पान्होळी, आकापूर, खडकी, डोंगरगाव, नागभीड (मुलांची) जीवनापूर, येनोली (माल) या शाळा या मिशनमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.नवचेतना मिशनसाठी ५५ शाळांची निवड करण्यात आली असली तरी पुरेसे अधिकारी या ठिकाणी कार्यरत नसल्याने शिक्षण विभागासमोर अनेक अडचणी येत आहेत. येथील गटशिक्षण अधिकाऱ्याचे पद दोन वर्षापासून रिक्त आहे. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या येथे पाच जागा मंजूर असल्या तरी केवळ दोन शिक्षण विस्तार अधिकारी येथे कार्यरत असून एकाकडे गटशिक्षण अधिकाऱ्याचा प्रभार आहे. (तालुका प्रतिनिधी)