चंद्रपुरात बॉम्बशोधक पथकाकडून सर्चिंग

By Admin | Updated: August 15, 2015 01:18 IST2015-08-15T01:18:16+5:302015-08-15T01:18:16+5:30

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फासावर चढविल्यानंतर या घटनेचा बदला घेण्याच्या हेतूने दहशतवाद्यांकडून घातपाती कारवाया होण्याची शक्यता ....

Searching from a bomb detection squad in Chandrapur | चंद्रपुरात बॉम्बशोधक पथकाकडून सर्चिंग

चंद्रपुरात बॉम्बशोधक पथकाकडून सर्चिंग

याकूबच्या फाशीची पार्श्वभूमी : स्वातंत्र्यदिनी घातपाताच्या शक्यतेने पोलीस सतर्क
चंद्रपूर: मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फासावर चढविल्यानंतर या घटनेचा बदला घेण्याच्या हेतूने दहशतवाद्यांकडून घातपाती कारवाया होण्याची शक्यता लक्षात घेऊन देशभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गुरूवारी चंद्रपूरसह जिल्हाभरात पोलिसांनी सर्चींग आॅपरेशन केले.
रात्री उशिरापर्यंत चंद्रपूर शहरात ही मोहिम राबविण्यात आली. यासाठी वेगवेगळ्या १० पथकांचे गठण करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांच्या विविध पथकांनी शहरातील गर्दीची ठिकाणे, महत्वाच्या इमारती, धार्मिकस्थळे आदी ठिकाणांवर शोध मोहिम राबविली. या पथकासोबत बॉम्बशोध व श्वानपथक होते. केवळ चंद्रपुरातच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरात हे सर्चींग आॅपरेशन राबविण्यात आले. (प्रतिनिधी)
याकूब मेमनला फाशी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी देशभरात सतर्क तेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्याभरात गुरूवारी सर्चिंग आॅपरेशन राबविण्यात आले. यापुढेही ही मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे.
-प्रल्हाद गिरी, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर
राष्ट्रीय सणाला धोका अधिक
याकूबला फासावर देण्यात आल्यानंतर दहशतवाद्यांच्या हालचाली लक्षात घेता स्वातंत्र्यदिनी दहशतवाद्यांकडून घातपात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस अधिकच सतर्क झाले आहे. त्यामुळे गुरूवारी पोलिसांनी दिवसभर चंद्रपूर शहरासह जिल्हाभर सर्चींग आॅपरेशन राबविले.
अफवांवर विश्वास ठेवू नका
काही विघातक शक्तींकडून अफवा पसरविली जाण्याची शक्यता आहे. मात्र नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. एखाद्या ठिकाणी संशयास्पदस्थिती वस्तू दिसून आली तर नजीकच्या पोलीस ठाण्यात त्याची तातडीने माहिती द्यावी. अशा वस्तुला कुणीही हात लावू नये, असे आवाहन पोलीस यंत्रणेच्यावतीने करण्यात आली आहे.

Web Title: Searching from a bomb detection squad in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.