शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेस स्थगिती द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:25 IST2021-03-07T04:25:04+5:302021-03-07T04:25:04+5:30

फोटो नागभीड : शाळाबाह्य मुलांची माहिती गोळा करण्याच्या कामाला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी म.रा.शि.परिषदेने केली आहे. यासंबंधीचे ...

The search for out-of-school children should be postponed | शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेस स्थगिती द्यावी

शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेस स्थगिती द्यावी

फोटो

नागभीड : शाळाबाह्य मुलांची माहिती गोळा करण्याच्या कामाला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी म.रा.शि.परिषदेने केली आहे. यासंबंधीचे निवेदन तहसीलदार मनोहर चव्हाण यांना दिले आहे.

वर्षभरापासून शहरी व ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा कोरोनाच्या भीतीमुळे शिक्षण विभागाने बंद ठेवलेल्या आहेत. असे असताना आता त्याच विभागाने गेल्या तीन महिन्यांपासून शाळेत न आलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतल्याने सर्व शिक्षक वर्ग अचंबित झाला आहे. विशेष म्हणजे कोरोना खबरदारीच्या साधनांची कोणतीही पुर्तता न करता शिक्षकांनी या काळात घरोघरी जावून सदरचे सर्वेक्षण करावे असे सक्तीचे करण्यात आले आहे.

मात्र सद्यस्थितीत हे काम अशक्य आहे. शाळाबाह्य असलेल्या मुलांची माहिती गोळा करण्याचे कामास तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नागभीड शाखेने तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे. शिष्टमंडळात म.रा.शि.प. नागभीड तालुका अध्यक्ष अमोल रेवस्कर, उपाध्यक्ष विलास भागडकर, कार्यवाहक धनंजय बोरकर यांच्यासह अनेकांचा समावेश होता.

Web Title: The search for out-of-school children should be postponed