रेशीम शेतीला विदर्भात वाव; मात्र शेतकऱ्यासह कृषी विभाग उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 02:40 PM2018-03-14T14:40:35+5:302018-03-14T14:40:49+5:30

विदर्भात रेशीम शेतीला भरपूर वाव आहे, असे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र अनेक शेतकरी या शेतीपासून अनभिज्ञ आहेत. या शेतीविषयी माहिती देण्यात कृषी विभागही अपयशी ठरत आहे.

Scope for silk farming in Vidharbha region; ignorance by farmers | रेशीम शेतीला विदर्भात वाव; मात्र शेतकऱ्यासह कृषी विभाग उदासीन

रेशीम शेतीला विदर्भात वाव; मात्र शेतकऱ्यासह कृषी विभाग उदासीन

Next
ठळक मुद्देजनजागृतीचा अभाव मार्गदर्शन करण्यात कृषी विभाग अपयशी

प्रवीण खिरटकर

लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर: विदर्भात रेशीम शेतीला भरपूर वाव आहे, असे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र अनेक शेतकरी या शेतीपासून अनभिज्ञ आहेत. या शेतीविषयी माहिती देण्यात कृषी विभागही अपयशी ठरत आहे. जिल्ह्याचे ठिकाण गाठून रेशीम संचालनालय कार्यालयात गेल्यावरच शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन मिळते. त्यामुळे तयारी असूनही शेतकरी रेशीम शेतीबाबत उदासीनता बाळगून आहे.
शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन या पारंपारिक शेतीसोबतच शेतीमध्ये जोडधंदे करावे. यासोबतच रेशीम शेती केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल. रेशीम शेतीकरिता विदर्भातील वातावरण योग्य असल्याचे मत कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. रेशीमला वस्त्रउद्योगात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने शेतकऱ्यांना भावही अधिक मिळण्याची शक्यता आहे. तरीही विदर्भात रेशीम शेती नगण्य असल्याचे दिसून येते. रेशीम शेती करण्याकरिता जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रेशीम संचालनालय कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. तालुकास्तरावर शेतकऱ्यांना रेशीम शेतीविषयी माहिती मिळण्यात अडचणी येत असल्याने शेतकरी रेशीम शेतीच्या माहितीपासून अनभिज्ञ राहत आहेत. प्रारंभी कुठलेही पीक नव्याने शेतात घेत असताना शेतकऱ्यांना वारंवार मार्गदर्शनाची आवश्यकता असते. जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय असल्याने आपल्याला वेळोवेळी रेशीम शेती करताना मार्गदर्शन मिळेल काय, अशी शंका शेतकऱ्यांना आहे.
तालुका स्तरावर कार्यालय नाही. रेशीम संचालन कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. रेशीम शेती सदर कार्यालयाशी संलग्न आहे. अशा प्रकारचे कार्यालय तालुका स्तरावर शासनाने सुरू केल्यास त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होऊन शेतकरी रेशीम शेतीकडे वळू शकतो.

तालुका कृषी विभागाकडून प्रस्ताव
रेशीम शेती करावयाची असल्यास प्रस्ताव जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रेशीम संचालनालयाकडे द्यावा लागतो. जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे त्रासदायक ठरत असल्याने तालुका कृषी विभागाकडे रेशीम शेतीचा प्रस्ताव दिल्यास तो रेशीम संचालनयाकडे कृषी विभागाने पाठविणे सुरू केले आहे.

कृषी विभागास रेशीम संचालनालय जोडावे
बहुतांश शेतीविषयी योजना तालुका कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर रेशीम संचालनालय हे कृषी कार्यालयाशी जोडल्यास रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी उपलब्धी होईल व तालुका स्तरावरील कृषी कार्यालयात जावून वेळोवेळी मार्गदर्शन घेणे रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सोयीचे ठरणार आहे.

 

Web Title: Scope for silk farming in Vidharbha region; ignorance by farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.