आॅनलाईन प्रक्रियेत अडकले शिष्यवृत्ती अर्ज
By Admin | Updated: September 11, 2014 23:24 IST2014-09-11T23:24:56+5:302014-09-11T23:24:56+5:30
महाविद्यालय व विशेष समाजकल्याण विभागात सुसुत्रता आणण्यासाठी शासनाने आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्ज प्रणाली कार्यान्वीत केली. मात्र, या आॅनलाईन प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचा मानसिक त्रास वाढला आहे.

आॅनलाईन प्रक्रियेत अडकले शिष्यवृत्ती अर्ज
चंद्रपूर : महाविद्यालय व विशेष समाजकल्याण विभागात सुसुत्रता आणण्यासाठी शासनाने आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्ज प्रणाली कार्यान्वीत केली. मात्र, या आॅनलाईन प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचा मानसिक त्रास वाढला आहे. वारंवार लिंक फेल होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत.
शाळा, महाविद्यालय सुरु होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज सादर केलेले नाही. समाजकल्याण विभागाने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सुचना देऊन अर्ज लवकर भरण्याचे सांगितले आहे. मात्र, समाजकल्याण विभागाचे संकेतस्थळ वारंवार फेल ठरत आहे. विद्यार्थ्यांची इंटरनेट कॅफेवर अर्ज भरण्याची गर्दी आहे. मात्र, संकेतस्थळ तासन्तास उघडत नसल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.
शासनाच्या समाजकल्याण विभागाने दोन वर्षापासून आॅनलाईन प्रणाली कार्यान्वीत केली आहे. या प्रणालीनुसार विद्यार्थी व महाविद्यालय समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करीत असतात. दहावी व बारावीचे शेकडो विद्यार्थी अद्यापही शिष्यवृत्ती अर्ज भरले नाही.
तर वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचेही नुकतेच प्रवेश झाल्याने अर्ज दाखल व्हायचे आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ‘लिंक फेल’ वाढल्याने विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. वरिष्ठांनी याची दखल घेत विद्यार्थ्यांना होणार त्रास दूर करण्याची मागणी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)