शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST2021-04-03T04:24:22+5:302021-04-03T04:24:22+5:30

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. त्यामध्ये ...

Scholarship Examination on 23rd May | शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी

शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. त्यामध्ये परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना मासिक शिष्यवृत्ती देण्यात येते. पूर्वी चौथ्या व सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येत होती. परंतु, आता यामध्ये बदल करून ही परीक्षा पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते. राज्यभरात एकाच दिवशी ही परीक्षा २५ एप्रिल रोजी घेण्यात येणार होती. परंतु, राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ही परीक्षा पुन्हा समोर ढकलून २३ मे रोजी घेण्यात येणार आहे.

बॉक्स

अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

परीक्षेसाठी शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत ३० मार्च २०२१ होती. यामध्ये वाढ करून १० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट एमएससीई पुणे डॉट इन आणि डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट एमएससीईपीयूपीपीएसएस डॉट या संकेतस्थळावर वेळापत्रक व माहिती पुस्तिका उपलब्ध आहे.

बॉक्स

१) दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याची शालेय विद्यार्थ्यांना लागण होऊ नये, या उद्देशाने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती आहे.

२) वेळापत्रकानुसार विद्यार्थी अभ्यासाला लागले होते. आता परीक्षेच्या तारखेत बदल झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास आणखी अवधी मिळणार आहे.

३) परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरला नव्हता त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची संधी मिळाली आहे.

Web Title: Scholarship Examination on 23rd May