बिरसा मुंडा पुतळा अवहेलनाच्या निषेधार्थ सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:25 IST2021-03-07T04:25:13+5:302021-03-07T04:25:13+5:30
चंद्रपूर : नियम धाब्यावर बसवून महानगर पालिकेने भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा क्रेनच्या सहाय्याने हटविल्याचाही आरोप करून आदिवासी संघटनांनी ...

बिरसा मुंडा पुतळा अवहेलनाच्या निषेधार्थ सत्याग्रह
चंद्रपूर : नियम धाब्यावर बसवून महानगर पालिकेने भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा क्रेनच्या सहाय्याने हटविल्याचाही आरोप करून आदिवासी संघटनांनी शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू केले. दरम्यान, पुतळ्याची पुनर्स्थापना होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा संकल्प आदिवासींनी जाहीर केला आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर मागील बीएसएनएल कार्यालयाशेजारी बसविण्यात आला. यासाठी महानगर पालिका व प्रशासनाच्या संबंधित विभागाकडून परवागनी घेण्यात आली, असा दावा पुतळा समितीचे प्रमुख अशोक तुमराम यांनी केला. मात्र, समितीला कोणतीही सूचना व नोटीस न देता अचानक अतिक्रमणाच्या नावाखाली क्रेनद्वारे हा पुतळा हटविण्यात आला, असा आरोपही संघटनेने केला. केवळ आदिवासीच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची प्रशासनाकडून पुनर्स्थापना होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आदिवासींनी केला आहे.