शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

साता समुद्रापलिकडून मदतीचा हात

By admin | Updated: February 5, 2016 00:50 IST

व्हाटस्अ‍ॅप, फेसबुकमुळे २३ वर्षांपूर्वीच्या मैत्रीचा धागा पुन्हा जुळला. कॉलेज जीवनातील मैत्रीचे रूपांतर संभाषणात झाले.

गावकरी भारावले : जुने ऋनाणुबंध फेसबुकमुळे पुन्हा जुळलेचंद्रपूर : व्हाटस्अ‍ॅप, फेसबुकमुळे २३ वर्षांपूर्वीच्या मैत्रीचा धागा पुन्हा जुळला. कॉलेज जीवनातील मैत्रीचे रूपांतर संभाषणात झाले. शिक्षणाची आवड असल्यामुळे राजशेखर चिंतापल्ली यांनी थेट सातासमुद्रापलिकडून कोरपना तालुक्यातील हेटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पाच हजार रुपयांची मदत पाठविली. परिणामी गावकऱ्यांनीसुद्धा शाळेला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सातासमुद्रापलिकडून आलेल्या मदतीचे गावकऱ्यांनी भरभरून कौतुक केले. हेटी येथील शाळा व्यवस्थापन समितीनेसुद्धा त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित केला.राजशेखर चिंतापल्ली आणि मुख्याध्यापक अरूण उमरे हे दोघेही नागपूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सन १९९२-९३ मध्ये मायनिंग या शाखेला शिक्षण घेत होते. त्यानंतर राजशेखर चिंतापल्ली यांनी व्हीआरसीई नागपूर येथून इंजिनिअरींगची पदवी पूर्ण केली. त्यानंतर विविध ठिकाणी त्यांनी भारतात नोकरी केली. मागील १३ वर्षापासून अमेरिका देशातील चेरी हिल, न्यु जर्सी येथे ते स्थायिक झाले. ते एनर्जी सर्व्हीस कंपनी, फिलाडेफिया येथे मोठ्या पदाच्या नोकरीवर कार्यरत आहे.राजशेखर चिंतापल्ली यांना शिक्षणाची आवड आहे. काही महिण्यापूर्वी अरुण उमरे आणि राजशेखर चिंतापल्ली हे फेसबुक, व्हाटस्अ‍ॅपमुळे जवळ आले. काही दिवसांपूर्वी मला शाळेला मदत करायची आहे, असे त्यांचे बोलणे झाले. उमरे यांनी होकार देताच राजशेखर चिंतापल्ली यांनी त्यांच्या वैयक्तिक खात्यावर पाच हजार रुपयांची मदत जमा केली. याचा उलगडा मुख्याध्यापक अरुण उमरे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गावकऱ्यांसमोर केला. त्यामुळे गावकऱ्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला. आपल्या हेटी गावाशी काही एकनाते नसताना परदेशातून मदत आली. म्हणून आपणही शाळेला दान द्यावे, या हेतुने ज्याच्या त्याच्या परीने गावकरी शाळेला मदत करू लागले आहेत. त्यानंतर राजशेखर चिंतापल्ली यांच्याशी अरुण उमरे यांनी संवाद साधला. गावकरीसुद्धा शाळेला मदत करीत असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांना खुप आनंद झाला. अमेरिकेतील लोकांना हसता येत नाही. आपल्या भारत देशातील लोक प्रत्येक विनोदावर हसतात. वेळप्रसंगी गंभीरही होतात. त्यामुळे हसण्याचा आनंद घेण्याकरिता भारतातील मित्र, नातेवाईकांशी नेहमी संवाद साधत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.सातासमुद्रापलिकडून राजशेखर चिंतापल्ली यांची हेटी शाळेला आलेली मदत खरच वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या आलेल्या मदतीतून शाळेतील संरक्षण भिंत बोलकी करण्याचा मानस आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी चालता, बोलता, खेळताना शिकेल, त्यांची उत्तरोत्तर प्रगती होईल, असे मुख्याध्यापक अरुण उमरे यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)