चंद्रपूरची सानिया दत्तात्रेय बनली ‘मिस इंडिया ग्लोब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 16:12 IST2018-08-06T16:10:19+5:302018-08-06T16:12:29+5:30

राजस्थानातील जयपूर शहरात रविवारी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय ‘मिस आणि मिस्टर ग्लोब इंडिया’ या सौंदर्यवती स्पर्धेत चंद्रपुरातील सानिया दत्तात्रेय ही कन्यका ‘मिस इंडिया ग्लोब’ ची मानकरी ठरली़.

Sania Dattatreya of Chandrapur becomes 'Miss India Globe' | चंद्रपूरची सानिया दत्तात्रेय बनली ‘मिस इंडिया ग्लोब’

चंद्रपूरची सानिया दत्तात्रेय बनली ‘मिस इंडिया ग्लोब’

ठळक मुद्देभारतातील २० सौंदर्यवंतीमध्ये प्रथम जयपूर येथे झाली अ़ भा़ स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: राजस्थानातील जयपूर शहरात रविवारी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय ‘मिस आणि मिस्टर ग्लोब इंडिया’ या सौंदर्यवती स्पर्धेत चंद्रपुरातील सानिया दत्तात्रेय ही कन्यका ‘मिस इंडिया ग्लोब’ ची मानकरी ठरली़. या स्पर्धेत भारतातील विविध राज्यातून २० युवक व युवती सहभागी झाले होते़ सानिया ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रेय यांची कन्या होय़ स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धंकांवर मात करून सानियाने सौंदर्यवतीचा पुरस्कार मिळविल्याने चंद्रपुरात आनंद व्यक्त केला जातो आहे़
जयपुरात रविवारी सायंकाळी सात वाजता ‘मिस आणि मिस्टर ग्लोब इंडिया’ या स्पर्धेला सुरूवात झाली़ ही स्पर्धा रात्री एक वाजेपर्यंत चालली़ सानियाने सर्वच फे ऱ्यांमध्येआपल्या सौंदर्य आणि बुद्धमत्तेची चुणूक दाखविल्याने परीक्षक ईमाम सिद्दीकी बिग बॉसवाला व अन्य सहा परीक्षकांनी तिला सौंदर्यवतीचा किताब जाहीर केला़ मान्यवरांच्या हस्ते सानियाला ‘मिस इंडिया ग्लोब’ चा मुकूट प्रदान करण्यात आला आहे़

Web Title: Sania Dattatreya of Chandrapur becomes 'Miss India Globe'