वर्धा नदीचा पात्रातून रेती चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST2021-03-17T04:28:23+5:302021-03-17T04:28:23+5:30

तेलंगणाच्या सीमावर्ती भागात असलेल्या पोडसा येथील वर्धा नदीचा पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती उपसा केला जात आहे. दिवसाढवळ्या सुरू ...

Sand theft from Wardha river basin | वर्धा नदीचा पात्रातून रेती चोरी

वर्धा नदीचा पात्रातून रेती चोरी

तेलंगणाच्या सीमावर्ती भागात असलेल्या पोडसा येथील वर्धा नदीचा पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती उपसा केला जात आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या रेती चोरीकडे प्रशासनाचे मात्र कमालीचे दुर्लक्ष होत आहे.

गोंडपिपरी तालुक्याला तीन नद्यांनी आणि अनेक नाल्यांनी वेढा दिला आहे. या नदी, नाल्यात मोठ्या प्रमाणात दर्जेदार रेती आहे. सध्या रेती घाटांना परवानगी नसल्याने, रेती चोरीचे प्रकार वाढले आहेत. रात्र बेरात्री रेती चोरीसाठी नदी, नाल्यातील घाटावर चोरांची गर्दी दिसून येत आहे. अशात सीमावर्ती भागात असलेला पोडसा घाट सुटलेला नाही. महाराष्ट्रातील शेवटचे गाव असलेल्या पोडसा गावाला लागूनच वर्धा नदीचे पात्र आहे. या पात्रातून दिवसाढवळ्या रेती चोरी सुरू आहे. या चोरीकडे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Sand theft from Wardha river basin