मूल उपजिल्‍हा रूग्‍णालयात ५० ऑक्‍सिजन बेडला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:36 IST2021-04-30T04:36:41+5:302021-04-30T04:36:41+5:30

चंद्रपूर : विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मूल येथे ५० ऑक्‍सिजन बेडला ...

Sanction of 50 oxygen beds in the original sub-district hospital | मूल उपजिल्‍हा रूग्‍णालयात ५० ऑक्‍सिजन बेडला मंजुरी

मूल उपजिल्‍हा रूग्‍णालयात ५० ऑक्‍सिजन बेडला मंजुरी

चंद्रपूर : विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मूल येथे ५० ऑक्‍सिजन बेडला मंजुरी देण्‍यात आली आहे. जिल्‍हाधिकारी यांनीही २९ एप्रिल २०२१ रोजीच्‍या आदेशान्‍वये याला प्रशासकीय मान्‍यता दिली आहे.

२७ एप्रिल रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय मूल येथे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली होती. त्‍यावेळी मूल शहर व तालुक्‍यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्‍या सोयीच्‍या दृष्‍टीने ५० ऑक्‍सिजन बेडला प्रशासकीय मान्‍यता देण्‍याची मागणी केली होती. त्‍यादृष्‍टीने स्‍थानिक यंत्रणांना जिल्‍हाधिकाऱ्यांकडे प्रस्‍ताव पाठविण्‍याच्‍या सूचना सुद्धा त्‍यांनी दिल्‍या होत्‍या. जिल्‍हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आ. मुनगंटीवार यांनी दोनच दिवसात ही मागणी पूर्णत्‍वास आणली आहे.

मूल येथील उपजिल्‍हा रूग्‍णालयात ५० ऑक्‍सिजन बेडसाठी ५० लाख रूपयाच्या खर्चाला प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे. येत्‍या ४ ते ५ दिवसात हे ऑक्‍सिजन बेड उपजिल्‍हा रूग्‍णालयातील रूग्‍णांच्‍या सेवेत रूजू होतील.

Web Title: Sanction of 50 oxygen beds in the original sub-district hospital