‘त्या’ सेवेला सलाम
By Admin | Updated: May 12, 2015 00:51 IST2015-05-12T00:51:57+5:302015-05-12T00:51:57+5:30
आजारी सैनिकांची सेवा करणारी जगातील पहिली नर्स म्हणजे प्लॉरेन्स नाईटिंंगेल होय. ज्याप्रमाणे माणूस देवळात जातो,

‘त्या’ सेवेला सलाम
आजारी सैनिकांची सेवा करणारी जगातील पहिली नर्स म्हणजे प्लॉरेन्स नाईटिंंगेल होय. ज्याप्रमाणे माणूस देवळात जातो, त्यावेळी तो प्रथम कळसाला वंदन करतो. कारण तो उंच आणि सोन्याचा असल्याने सूर्य प्रकाशात चमकत असतो. पण कळस चमकण्यासाठी तो उभा करण्यासाठी दगड माती यांचा पाया उभा केलेला असतो. त्या पायावर मंदिर बांधलेले असते. त्यामुळे आपले लक्ष कळसावर केंद्रीत होते. त्याप्रमाणे आज सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णांची सेवा करताना सर्व परिचारिका भगिनी निरपेक्ष भावनेतून रुग्ण सेवा करतात. ही रुग्णसेवा एका महान महान व्यक्तीने केली. ती व्यक्ती म्हणजे फ्लॉरेन्स नार्इंटिगेल होय. फ्लॉरेन्स नाईर्टिगेल याचा जन्म इटालीमधील फ्लॉरेन्स या गावी १२ मे १८२० रोजी अतिशय श्रीमंत घराण्यात झाला. त्यांच्या घरी नोकर-चाकर होते. त्यांना कशाची पण उणिव नव्हती. त्यांच्याकडे आलेल्या गोर-गररीब माणसांविषयी त्यांना तळमळ वाटे, प्रेम माया वाटे. या लोकांकरिता आपण काही तरी करावे, असे त्यांना सतत वाटे. पण घरच्या श्रीमंत परिस्थितीमुळे त्यांना काही करता येत नव्हते.
रशियन क्रिमीयन युद्धाचा तो काळ होता. १८५४ साली रशियन सैनिकांना सिस्टर आॅफ चॉरिटी नर्सिंग मदत करीत असत. पण इंग्लडच्या सैनिकांना मात्र कुणीही मदत करत नव्हते. अशावेळी त्यांचे दु:ख पाहून फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांनी आपले पथक तयार करुन हजारो सैनिकांचे प्राण वाचविले. त्यांना या दु:खातून सोडवून त्यांचे प्रमाण वाचविले. युद्धभूमीवर जावून त्यांची सेवा केली.
त्यामुळे हजारो सैनिकांचा जीव वाचला. जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून त्यांनी मदत केली. रात्रीच्यावेळीसुद्धा हातात मेणबती घेऊन सैनिकांची विचारपूस, सेवा केलीय त्याचमुळे फ्लॉरेन्स नाईटिंगेला ‘लेडी वुईथ लॅम्प’ ही पदवी बहाल करण्यात आली.
फ्लॉरेन्स नाईटिंगेलने सेन्ट थॉमस हॉस्पीटलमध्ये १८६० साली नर्सिंग स्कूल सुरू केले. यातूनच प्रेरणा घेऊन आज सर्व रुग्णालयांमध्ये नर्सिंग स्कूल काढण्यात आल्या आहेत. त्यात दरवर्षी शेकडो परिचारिका शिक्षण घेत आहेत. त्याचे हे श्रेय सर्व प्लॉरेन्स नाईटिंगेल यांनाच मिळते.
डॉक्टरांच्याही आधी ज्यांच्याकडून सुश्रृश्येला सुरूवात होते त्या असतात, परिचारिका. आपले कौटुंबिक कर्तव्य बाजुला ठेवून आजारी माणसांच्या सेवेत राबणाऱ्या या परिचारिका सेवाव्रतीच नव्हे, तर कधीकधी देवदूतही वाटतात. रूग्णसेवेत वाहून घेण्याची प्रेरणा ज्या प्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्याकडून मिळाली, त्या नक्कीच मोठ्या आहेत.
१८५४ च्या रशियाविरुद्ध क्रियमन युद्धाच्या वेळी ब्रिटन युद्ध सचिवांच्या विनंतीवरुन फ्लॉरेन्स प्रशिक्षित परिचारिकांसह स्कुवरी येथील सैनिकी रुग्णालयात जखमी सैनिकांची शुश्रूषा करण्यासाठी दाखल झाल्या. तेथील युद्धकाळाच्या अत्यंत गलीच्छ वातावरणात, औषधे, साधन-सामग्रीच्या तुटवड्यात, बिकट परिस्थितीला तोंड देत त्यांनी जखमी सैनिकांची शुश्रूषा करुन मृत्यूचं प्रमाण कमी केलं.
१९१० मध्ये फ्लॉरेन्स जरी आपल्यातून निघून गेल्या तरी त्यांच्या कार्याचा ‘दीप’ आजही परिचारिकांच्या कार्याच्या रुपाने आपल्या सेवेत तेवत आहेत. आज नर्सिंगच्या कामाकडे खूप आदराने पाहिले जाते. अनेक युवती परिचारिका होण्यास उत्सूक आहेत. हेच फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या कठोर परिश्रमाचे सार्थक आहे.