बल्लारपूरात भिमा कोरेगावच्या लढ्यातील शूरवीरांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:29 IST2021-01-03T04:29:01+5:302021-01-03T04:29:01+5:30
बल्लारपूर : शहरातील विद्यानगर वॉर्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समता सैनिक दलाच्या वतीने सकाळी भिमा कोरेगावच्या लढ्यातील शूरवीरांना ...

बल्लारपूरात भिमा कोरेगावच्या लढ्यातील शूरवीरांना मानवंदना
बल्लारपूर : शहरातील विद्यानगर वॉर्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समता सैनिक दलाच्या वतीने सकाळी भिमा कोरेगावच्या लढ्यातील शूरवीरांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी प्रभूदास देवगडे, बुद्धशील बहादे, भीमचंद पाटील यांच्यासह समता सैनिक दलाच्या सैनिकांनी मानवंदना दिली. याशिवाय बल्लारपूर शहरातील नगर परिषद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात अनेक आंबेडकरी अनुयायांनी भिमा कोरेगावच्या विजयी स्तंभाला मानवंदना देऊन महामानवाला अभिवादन केले. याशिवाय १ जानेवारी २०१८ ला भिमा कोरेगाव परिसरात अनैतिक कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासंदर्भात फलकाद्वारे निदर्शने करण्यात आली. यावेळी विचार व्यक्त करताना मान्यवरांनी म्हटले की भिमा कोरेगाव म्हणजे एका संघर्षाची लढाई नसून, ती अस्तित्वाची व आत्मसन्मानाची लढाई होती. विषमतेविरुद्धचा लढा होता.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजय चव्हाण, संजय लोहकरे, विशाल डुंबेरे, ॲड. प्रियंका चव्हाण, अशोक भावे यांच्यासह अनेक तरुण-तरुणींची उपस्थिती होती.
कॅप्शन : मानवंदना कार्यक्रमात बल्लारपुरातील सामाजिक कार्यकर्ते.