सलून पार्लर आता दर सोमवारी राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:54 IST2021-02-28T04:54:11+5:302021-02-28T04:54:11+5:30

चंद्रपूर : कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सलून, स्पा, बार्बर शॉप, ब्युटीपार्लर, केश कर्तनालय आदी दुकाने व आस्थापना आता दर सोमवारी ...

The salon parlor will now be closed every Monday | सलून पार्लर आता दर सोमवारी राहणार बंद

सलून पार्लर आता दर सोमवारी राहणार बंद

चंद्रपूर : कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सलून, स्पा, बार्बर शॉप, ब्युटीपार्लर, केश कर्तनालय आदी दुकाने व आस्थापना आता दर सोमवारी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र नाभिक महामंडळांनी जिल्ह्यातील सर्व सलून, पार्लर आठवड्यातून एक दिवस पूर्णत: बंद ठेऊन दुकान, आस्थापना व त्यातील सर्व साहित्यांची साफसफाई करून निर्जंतुकीकरण करण्याकरिता जिल्हा प्रशासनास याबाबतचे आदेश निर्गमित करण्यास विनंती केली होती. सदर विनंती ही कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोणातून योग्य वाटत असल्याने जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी आदेश दिले आहेत. निर्देशाचे पालन न केल्यास संबंधितांवर साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम तसेच भारतीय दंड संहितामधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

Web Title: The salon parlor will now be closed every Monday