बंद पाऊचमध्ये गावठी दारुची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:01:18+5:30

गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे या परिसरात दारु सहज उपलब्ध होते. करोनाच्या लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद झाल्याने मद्यपींना दारु मिळणे कठीण झाले. त्यामुळे तालुक्यातील तळीरामांनी हातभट्टीचा आधार घेत मद्य तृष्णा भागविण्याचा पर्याय शोधला.

Sale of village liquor in closed pouches | बंद पाऊचमध्ये गावठी दारुची विक्री

बंद पाऊचमध्ये गावठी दारुची विक्री

ठळक मुद्देगोंडपिपरीतील प्रकार : दारू विक्रेत्यांची नवी शक्कल

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : लॉकडाऊनमुळे गावठी दारुविक्रेते सक्रीय झाले आहेत. गोंडपिपरी तालुक्यात तर मोहफुल व गुळाची दारू प्लास्टिक बंद पाऊचमध्ये भरून सर्रास विक्री सुरु आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून बंद पाऊची सेवा तळीरामांना घरपोच मिळत असल्याचे चित्र आहे.
गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे या परिसरात दारु सहज उपलब्ध होते. करोनाच्या लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद झाल्याने मद्यपींना दारु मिळणे कठीण झाले. त्यामुळे तालुक्यातील तळीरामांनी हातभट्टीचा आधार घेत मद्य तृष्णा भागविण्याचा पर्याय शोधला. तालुक्यात अनेक दारुविक्रेते सक्रीय होत हातभट्टीद्वारे मोहफुल, गुळ तसेच तुरटी मिश्रित दारुची विक्री सुरु केली. लॉकडाऊनमुळे दारूची मागणी वाढताच विक्रेत्यांनी नवी शक्कल लढवत पॉकेटबंद दारुची निर्मिती करुन मागणीनुसार घरोघरी विक्री करीत आहेत. अशा दारुमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


तेलंगणा तथा तालुक्याच्या सीमावर्ती भागात पोलीस अधिक लक्ष घालून कार्य करीत आहेत. योग्य माहिती मिळताच कारवाई करण्यात येईल
- संदीप धोबे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, गोंडपिपरी

Web Title: Sale of village liquor in closed pouches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.