शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

बरांज तांडा परिसरात सर्रास दारू विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:35 AM

शहरातील विविध वॉर्डात छुप्या मार्गाने देशी व विदेशी दारूची सर्रास विक्री होत आहे. परंतु या दारूचा दर अधिक असल्याने मद्यपींनी बरांज तांडा परिसरातील हातभट्टीकडे जात असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देयुवापिढी व्यसनांच्या विळख्यात : सायंकाळी मद्यपींची चंगळ

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शहरातील विविध वॉर्डात छुप्या मार्गाने देशी व विदेशी दारूची सर्रास विक्री होत आहे. परंतु या दारूचा दर अधिक असल्याने मद्यपींनी बरांज तांडा परिसरातील हातभट्टीकडे जात असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात दारूबंदी जिल्हा असली तरी भद्रावती तालुक्यात देशी व विदेशी दारू सहजपणे उपलब्ध होते. तर दुसरीकडे बरांज तांडा परिसरातील हातभट्टीवर दारू काढण्याचे प्रमाण वाढले. देशी व विदेशी दारूच्या किमती वाढविल्याने मद्यपींनी बरांज तांडाकडे मोर्चा वळविला. दरम्यान, पोलिसांनी अनेकदा धाडी टाकून आरोपींना जेरबंद केले. कित्येकदा विशेष मोहीमसुद्धा राबविली. परंतु दारु काढणाऱ्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच आहे. या परिसरातील बºयाच दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले. काहींनी तुरूंगवास भोगला पण दारूचा व्यवसाय अजुनही बंद केला नाही.तालुक्यात रोजंदारी करणाºया कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अंगमेहनतीची कामे करीत असल्याने बहुतेकांना दारूचे व्यसन जडले. गावठी दारू सहज मिळू लागल्याने युवापिढी व्यसनाच्या आहारी गेली. तालुक्यात मिळणारी देशी व विदेशी दारूचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने मद्यपी आता बरांज तांडा येथे जात आहेत. यामध्ये बेरोजगार युवकांची संख्या अधिक असल्याचे वास्तव पुढे आले आहे. तांड्यावरील दारूची मागणी वाढली आहे. हातभट्टीची दारू काढण्यासाठी प्रामुख्याने मोह फुलाची आवश्यकता असते. परंतु हातभट्टी दारूची मागणी लक्षात घेऊन जंगलातील सळलेला पाला पोचाळा, विशिष्ट झाडांच्या साली तसेच विविध प्रकारच्या रासायनांचा वापर केला जात आहे. परंतु मद्यपी या प्रकाराकडे दुर्लक्ष करून केवळ नशेसाठी हातभट्टीची दारू पित असल्याची माहिती या परिसरातील नागरिकांनी दिली. गावठी दारूमुळे परिसरातील शेकडो मद्यपींना वेगवेगळे आजार जडले. कुटुंबांमध्ये भांडणे वाढली. मुलाबाळांच्या शिक्षणावर खर्च होणारा पैसा वाममार्गाला जाऊ लागला. परिणामी, शेकडो कुटुंबातील महिला हैराण झाल्या आहेत. ही दारू केवळ १० ते २० रूपये ग्लास मिळत असल्याने पिणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. यातून शेकडो कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहेत. पोलिसांकडून कारवाई होऊनही दारू का बंद झाली नाही, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.व्यसन मुक्ती शिबिर सुरू कराजिल्हा दारुबंदी होवून पाच वर्षे होत आहे. दारूबंदीपूर्वी नागरिकांच्या आरोग्याचा विषय पुढे करून तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी प्रशंसा व मते मिळविलजी. पण, बंदीनंतरही सुरू असलेल्या दारु विक्रीच्या प्रश्नावरून पोलिसांवर दबाव वाढविला नाही. बरांज तांडा येथील हातभट्टीची दारु पिऊन शेकडो नागरिकांचे आरोग्य बिघडले. काही व्यक्तींचा मृत्यू झाला. परंतु शासनाने या पाच वर्षात एकही व्यसन मुक्ती शिबिर राबविले नाही. यामुळे कागदावरील दारूबंदीविषयी महिला संताप व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदी