सचिनने ताडोबात केली सर्जा-राजाची पूजा; तुकुम येथील शेतकऱ्यांसोबत केला पोळा सण साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 07:00 AM2021-09-07T07:00:00+5:302021-09-07T07:00:01+5:30

Chandrapur News शनिवारपासून परिवारासह मुक्कामी असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना तिसऱ्या दिवशीही व्याघ्रदर्शन झाले नाही. मात्र, सोमवारी पोळ्याचे दिवशी सचिनने रिसॉर्टमध्येच बैलांची पूजा करून शेतकऱ्यांसोबत पोळा साजरा केला.

Sachin worships Sarja-Raja at Tadoba; Celebrate the hive festival with the farmers of Tukum | सचिनने ताडोबात केली सर्जा-राजाची पूजा; तुकुम येथील शेतकऱ्यांसोबत केला पोळा सण साजरा

सचिनने ताडोबात केली सर्जा-राजाची पूजा; तुकुम येथील शेतकऱ्यांसोबत केला पोळा सण साजरा

Next
ठळक मुद्दे तिसऱ्या दिवशीही वाघाची प्रतीक्षा

राजकुमार चुनारकर

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : वाघाच्या भेटीसाठी चिमूर तालुक्यातील ताडोबाच्या कोलारा गेटमधील खासगी रिसॉर्टमध्ये शनिवारपासून परिवारासह मुक्कामी असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना तिसऱ्या दिवशीही व्याघ्रदर्शन झाले नाही. मात्र, सोमवारी पोळ्याचे दिवशी सचिनने रिसॉर्टमध्येच बैलांची पूजा करून शेतकऱ्यांसोबत पोळा साजरा केला. (Sachin worships Sarja-Raja at Tadoba; Celebrate the hive festival with the farmers of Tukum)

क्रिकेट विश्वात अनेक विक्रम नोंदविणारे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजली, मुलगी सारा व मित्र परिवार यांच्यासोबत शनिवारी चिमूर तालुक्यातील बांबू रिसॉर्टमध्ये दाखल झाले. त्यानंतर सतत दोन दिवस सकाळी व दुपारी ताडोबा बफर झोनमधील जंगलाची भ्रमंती केली. मात्र, त्यांना वाघाचे दर्शन झाले नाही. सोमवारी नव्या उमेदीने सकाळी व दुपारी मदनापूर गेटवरून सफारी केली. मात्र, तिथेही हरिण, सांबर, मोर, रानगवा या तृणभक्षी प्राण्यांच्या दर्शनावरच समाधान मानावे लागले.वाघाने सचिनला तिसऱ्या दिवशीही दर्शन दिले नाही. त्यामुळे सचिनला

व्याघ्रदर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, सोमवारी पाेळा असल्याने सचिनने बांबू रिसॉर्ट येथे तुकुम येथील शेतकरी विनोद निखाडे, तेजराम खिरटकर यांच्या बैलजोडीची पूजा केली. शेतकऱ्यांना टोपी, दुपट्टा देऊन त्यांचा सत्कार करीत बैल पोळा साजरा केला.

Web Title: Sachin worships Sarja-Raja at Tadoba; Celebrate the hive festival with the farmers of Tukum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.