ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST2021-02-05T07:42:08+5:302021-02-05T07:42:08+5:30
रस्त्यावरील पार्किंगमुळे अडचण टेमुर्डा : टेमुर्डा हे गाव नागपूर-चंद्रपूर महामार्गावर असून ३५ ते ४० गावांचे केंद्रस्थान आहे. त्यामुळे या ...

ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती करावी
रस्त्यावरील पार्किंगमुळे अडचण
टेमुर्डा : टेमुर्डा हे गाव नागपूर-चंद्रपूर महामार्गावर असून ३५ ते ४० गावांचे केंद्रस्थान आहे. त्यामुळे या सर्व गावाचा टेमुर्डा गावाशी संपर्क येतो. येथील जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेकांनी हॉटेल, चहाटपरी, फळभाजी विक्रेते, हार्डवेअर, किराणा, जनरल स्टोअर्स असे छोटे-मोठे व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.
अल्प उत्पादनामुळे शेतकरी हवालदिल
वरोरा : तालुक्यात खरीप हंगामातील विविध पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे खर्चाच्या तुलतेत उत्पन्न कमी झाले. यामुळे कर्जाचा भरणा कसा करावा, या प्रश्नाने शेतकरी हवालदिल झाले आहे.
बोंडअळीच्या प्रादुर्भावाने उत्पन्नात घट झाली होत आहे. डोक्यावरील कर्जात मात्र वाढ झाली आहे.
शासकीय योजनांची माहिती द्या
घुग्घुस : शासनाकडून सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. मात्र या योजनांची माहितीच अनेकांपर्यंत पोहोचली नसल्याने नागरिक योजनांपासून वंचित आहे. योजनांची माहिती ग्रामीण नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी आहे.
प्रदूषणावर आळा घालण्याची मागणी
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औष्णिक वीज प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पातून निघणाऱ्या धुरांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे या प्रदूषणाच्या समस्येवर लवकरात लवकर आळा घालण्याची मागणी चंद्रपुरातील नागरिकांनी केली आहे.
बाजारात डुकरांचा हैदोस सुरूच
मूल : स्वच्छता अभियानात पुढे असलेली मूल नगर परिषद शहरात मोकाट फिरणाऱ्या डुकरांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत आहे. आठवडी बाजार परिसर व शहरातील अनेक वॉर्डात डुकरांचा हैदोस मोठ्या प्रमाणात वाढला असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.