विकास कामासाठी साडेपाच कोटींचा निधी

By Admin | Updated: August 11, 2014 23:50 IST2014-08-11T23:50:29+5:302014-08-11T23:50:29+5:30

गडचांंदूर नगर परिषदेची सत्ता प्रशासकाच्या हातात गेल्यानंतर पहिल्यांदाच स्थानिक बिरला सभागृहात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार सुभाष धोटे यांनी गडचांदूर नगर परिषदेला

Rs.5.5 crores fund for development works | विकास कामासाठी साडेपाच कोटींचा निधी

विकास कामासाठी साडेपाच कोटींचा निधी

गडचांदूर : गडचांंदूर नगर परिषदेची सत्ता प्रशासकाच्या हातात गेल्यानंतर पहिल्यांदाच स्थानिक बिरला सभागृहात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार सुभाष धोटे यांनी गडचांदूर नगर परिषदेला शासनाकडून साडेपाच कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
साडेपाच कोटींची कामे दोन महिन्यात पूर्ण होणार असून यात व्यवस्थापन, आठवडी बाजाराचे नियोजन, वाहनतळ, अग्निशामक वाहन व नियंत्रण कक्ष, कर्मचाऱ्यांचे वेतन, सांंडपाण्याचे व्यवस्थापन आदींवर खर्च होणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून १.५ कोेटी रस्ते व वैशिष्टयपूर्ण निधी, ५० लाख अग्निशामक वाहन व नियंत्रण कक्ष, ५० लाख मागास क्षेत्र अनुदान, नगरोत्थान योजनेंतर्गत ७५ लाख, जिल्हा नियोजन निधीतून १.५० कोटी असा निधी त्वरित प्राप्त होणार आहे. यावेळी प्रशासन एम.टी. वलथरे व मुख्य कार्यकारी अधिकारी सरनाईक उपस्थित होते. यावेळी सरनाईक यांनी शहर विकासाचा आराखडा झाला असल्याचे सांगून शहरात तात्काळ विकास कामांना सुरुवात होणार असल्याचे सांगितले. दीड किलोमिटर खडीकरण, तीन किमी डांबरीकरणण व एक किमी काँक्रीटीकरणासाठी निधी मंंजूर होणार असून गडचांदूरचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी सरपंच सुमन आत्राम, उपसरपंच पापय्या पोन्नमवार, राजुरा नगर परिषदेचे उपाध्यक्ष अरुण धोटे, विजय ठाकुरवार, हंसराज चौधरी, विक्रम येरणे, सागर ठाकुरवार, बापुराव गोरे, बापुराव शेरकी, केशव डोहे, सुरेश मेश्राम आदी नागरिक उपस्थित होते. संचालन प्रा. विजय आकनुरवार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Rs.5.5 crores fund for development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.