ब्रह्मपुरी तालुक्यात रोवणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST2021-07-19T04:18:48+5:302021-07-19T04:18:48+5:30

ब्रह्मपुरी : तालुक्यात मागील आठवड्यात पडलेल्या पावसाच्या जोरावर रोवणीला वेग आल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात एकूण खरीप पीक क्षेत्र ...

Rowani speed in Brahmapuri taluka | ब्रह्मपुरी तालुक्यात रोवणीला वेग

ब्रह्मपुरी तालुक्यात रोवणीला वेग

ब्रह्मपुरी : तालुक्यात मागील आठवड्यात पडलेल्या पावसाच्या जोरावर रोवणीला वेग आल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यात एकूण खरीप पीक क्षेत्र १८ हजार ९०० हेक्टर असून, त्यापैकी ११ हजार १६० हेक्टर आवत्याखाली असून, १७ हजार ७४० हेक्टरवर खरीप पिके घेतली आहे. ब्रह्मपुरी तालुका धान पिकाचे कोठार म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. येथील तांदूळ राज्यात व राज्याबाहेर जात असल्याने मागणी मोठी असते. बहुतांश उत्पादन वर्षभराच्या उदरनिर्वाहासाठीही केले जाण्याची परंपरा कायम आहे. तरी पण तांदूळ पिक मोठ्या मेहनतीने घेतले जाते. मागील आठवड्यात व चालू आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने हळूहळू रोवणीला वेग आला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पाच महसूल मंडल आहेत. मंडलनिहाय पावसाची स्थिती लक्षात घेतली असता ब्रह्मपुरी मंडल ५०९. ७ मिमी, चौगाण मंडल ४७७.९ मिमी, गांगलवाडी मंडल ५२२.५, अऱ्हेरनवरगाव मंडल ५५६.९ व मेंडकी मंडल ४६९.५ मिमी पाऊस झाला आहे. पाचही मंडलांत सरासरी ५०० मिमी पाऊस झाला असल्याने तूर्त बळीराजा सुखावला असला तरी पीक हातात येईपर्यंत भरोसा नसल्याने विवंचना कायम असते. सध्या रोवणी कामाला वेग आला असून रोवणीची गाणी शेतशिवाराजवळून गेल्यास ऐकायला मिळत आहे.

बॉक्स

वाघाची दहशत कायमच

तालुक्याच्या मेंडकी महसूल मंडलात वाघाची दहशत कायम असल्याने शेतीची कामे करताना अडचण निर्माण होत आहे. मानव व वन्यजीव संघर्ष अधूनमधून होत असतो. यासाठी वनविभाग अहोरात्र गस्त घालून वाघांची स्थिती लक्षात घेण्याचे काम करीत आहे हे विशेष.

180721\img_20210716_161004.jpg

रोवणी करताना महिला मजूर वर्ग

Web Title: Rowani speed in Brahmapuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.