‘गुलाब’ कोमजला; चंद्रपूरचे संकट टळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 20:43 IST2021-09-27T20:43:12+5:302021-09-27T20:43:41+5:30
Chandrapur News भारतीय हवामान विभागाने सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिला होता. मात्र, हे वादळ तिथेच तिथेच रोखल्याने ‘गुलाब’ कोमेजला आणि चंद्रपूरचे संकट टळले, अशी प्रतिक्रिया नागरिकांत उमटली.

‘गुलाब’ कोमजला; चंद्रपूरचे संकट टळले!
चंद्रपूर : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळ निर्माण झाल्याने आंध्र प्रदेशाच्या उत्तर किनारपट्टीला स्पर्श होताच भारतीय हवामान विभागाने सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिला होता. मात्र, हे वादळ तिथेच तिथेच रोखल्याने ‘गुलाब’ कोमेजला आणि चंद्रपूरचे संकट टळले, अशी प्रतिक्रिया नागरिकांत उमटली.
याश या चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर भारतीय हवामान विभागाने ‘गुलाब’ चक्रीवादळबाबत सतर्क करताच जिल्हा प्रशासन कामाला लागले. संभाव्य मुसळधार पाऊस पडल्यास धरण क्षेत्रातील नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, याची माहिती माध्यमांकडे पाठविण्यात आली होती. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. या पावसामुळे धरणांची पातळी वाढल्यास पाण्याचा विसर्ग करावा लागणार, अशाही सूचना देण्यात आल्या. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार झालेला ‘गुलाब’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशाच्या उत्तर किनारपट्टीलाच थांबल्याने संकट टळले. सोमवारी चंद्रपूर शहरासह काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू होता. दिवसभर कुठेही मुसळधार पाऊस बरसला नाही.
महाऔष्णिक वीज केंद्राची खबरदारी
भारतीय हवामान विभागाने इशारा दिल्याने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने खबरदारी घेतली. इरई धरणात सध्या २०७. १०० मी. जलसाठा आहे. मुसळधार पाऊस बरसल्यास पाण्याची कमाल पातळी गाठू शकते. त्यामुळे पद्मापूर, किटाळी, मसाळा, पडोली, यशवंतनगर, दाताळा, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळभ, चिचोली, कढोली, पायली व अन्य गावांतील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले.