पाचगाव येथील नऊ घरांचे छत उडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:01 IST2020-03-17T05:00:00+5:302020-03-17T05:01:05+5:30

दोन दिवसापूर्वी विजेच्या गडगडाटासह अचानक वादळ- वाऱ्याने हजेरी लावली. यात हिरामण जीवतोडे यांच्या घराचे छत वादळाने अक्षरश: शेतात नेऊन फेकले. वादळ आले तेव्हा घरी सर्वजण एकत्र बसले होते. नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. राजू भोयर यांच्या घराचेही नुकसान झाले. पाचगाव येथील संदीप आगरकर, बंडू कुरटकर, अरुण चिडे, किसन पाल, सुधाकर गेडेकर, पंढरी गौरकर, चेतन विरंदडे याच्या घरांची व गोठ्यांची पडझळ झाली.

The roof of nine houses in Panchagaon was blown up | पाचगाव येथील नऊ घरांचे छत उडाले

पाचगाव येथील नऊ घरांचे छत उडाले

ठळक मुद्देवादळी पावसाचा फटका : शेतपिकांचेही मोठे नुकसान, शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : राजुरा तालुक्यातील पाचगाव येथे आलेल्या वादळामध्ये गावातील ९ घरांचे छत उडाले. दरम्यान, अवकाळी पावसाने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दोन दिवसापूर्वी विजेच्या गडगडाटासह अचानक वादळ- वाऱ्याने हजेरी लावली. यात हिरामण जीवतोडे यांच्या घराचे छत वादळाने अक्षरश: शेतात नेऊन फेकले. वादळ आले तेव्हा घरी सर्वजण एकत्र बसले होते. नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. राजू भोयर यांच्या घराचेही नुकसान झाले. पाचगाव येथील संदीप आगरकर, बंडू कुरटकर, अरुण चिडे, किसन पाल, सुधाकर गेडेकर, पंढरी गौरकर, चेतन विरंदडे याच्या घरांची व गोठ्यांची पडझळ झाली.
गावातील विजतारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. वादळात वीज डीपी कोसळल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले. शेतातील गहू, हरभरा, ज्वारी काढणीवर असताना तोंडात आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. शेतात पिकांची कापणी करून ठेवलेले तेही ओले झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पाचगावसह परिसरातील अहेरी, खामोना, वरूड, भेदोडा येथील शेतीची दाणादाण झाली असून शेतकरी चिंतेत पडले आहे.

Web Title: The roof of nine houses in Panchagaon was blown up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस