कोरोना विरुद्धच्या लढ्यात आता रोबोटही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 05:00 AM2020-05-09T05:00:00+5:302020-05-09T05:00:52+5:30

टाटा टेक्नॉलॉजीचे प्रोजेक्ट मॅनेजर मनीष कुमार, यांत्रिकी अभियंता जीवन काळे, दानिश पठाण व त्यांच्या चमूने मेडी-रोवर हा रोबोट चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सीआयआयटी प्रयोग शाळेअंतर्गत तयार केला आहे. यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. विशेष बाब म्हणजे, या कामासाठी विशेष मार्गदर्शन बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी दिले होते.

Robots now in the fight against Corona | कोरोना विरुद्धच्या लढ्यात आता रोबोटही

कोरोना विरुद्धच्या लढ्यात आता रोबोटही

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रपूरकरांनी बनविला मेडी रोवर रोबोट : रुग्णांच्या सेवेत रुजू

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टरांच्या मदतीसाठी जिल्ह्यात टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडने बनवलेला आधुनिक मेडी-रोवर रोबोट शनिवारपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तयार झालेला हा रोबोट जिल्हा आरोग्य यंत्रणेला सुपूर्द केला. कोरोना रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी हा रोबोट मदत करणार असून भविष्यात यामध्ये काही सुधारणा करून नमुने तपासणीसाठी मदत करता येणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार झपाटयाने होत आहे. जिल्ह्यामध्ये एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यातच आता मेडी- रोवर नामक रोबो कोरोना रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी मदत करणार आहे.
मेडी-रोवर रोबोटचा प्रमुख उद्देश रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी यांचा कमितकमी संपर्क यावा हा आहे.
टाटा टेक्नॉलॉजीचे प्रोजेक्ट मॅनेजर मनीष कुमार, यांत्रिकी अभियंता जीवन काळे, दानिश पठाण व त्यांच्या चमूने मेडी-रोवर हा रोबोट चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सीआयआयटी प्रयोग शाळेअंतर्गत तयार केला आहे. यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. विशेष बाब म्हणजे, या कामासाठी विशेष मार्गदर्शन बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी दिले होते.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या रोबोटची शुक्रवार पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, यांत्रिकी अभियंता जीवन काळे, दानिश पठाण उपस्थित होते.

हे आहे मेडी-रोवरचे वैशिष्ट्य
हा रोबोट वायरलेस असून बॅटरी आॅपरेटेड आहे. याची वाहक क्षमता ३० किलो आहे. या रोबोटला १० मीटरपर्यंत आॅपरेट करता येऊ शकतो. तसेच रुग्णांना खाण्यापिण्याचे सामान, मेडिसीन, उपयुक्त सोयीसुविधा पुरवण्यासाठी हा रोबोट मदत करणार आहे. हा रोबोट सहज हाताळता येणार आहे.

Web Title: Robots now in the fight against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Robotरोबोट