ग्रामीण भागातील रस्ते झुडपांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:24 IST2021-01-14T04:24:12+5:302021-01-14T04:24:12+5:30

कोरपना : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मार्गावरून जाणे-येणे कठीण झाले ...

Roads in rural areas are covered with bushes | ग्रामीण भागातील रस्ते झुडपांच्या विळख्यात

ग्रामीण भागातील रस्ते झुडपांच्या विळख्यात

कोरपना : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मार्गावरून जाणे-येणे कठीण झाले आहे. यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

ग्रामीण क्षेत्रातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या

माथा - शेरज, पिपरी - लोणी , नारडा - आवारपूर, आसन - आवारपूर, रामपुर - वडगाव, कुसळ- कमलापूर, सावलहिरा - खैरगाव, येरगव्हण - हातलोणी, लालगुडा - नांदा , भोयगाव - भारोसा, नारडा - नारडा फाटा, वनोजा - वनोजा फाटा , सांगोडा - कारवाई, धानोली - धनकदेवी, वन सडी - कारगाव, गडचांदूर - नांदा , कोरपना - पारडी , रुपापेठ - खडकी, कोडशी - कोरपना , कन्हाळगाव - मांडवा

आदी मार्गावर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढल्याने समोरून येणारे वाहन किंवा व्यक्ती दिसून येत नाही. परिणामी अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यानंतरही संबंधित विभागाने या मार्गावरील झुडपांचे व्यवस्थापन केले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Roads in rural areas are covered with bushes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.