लालपेठ जुनी वस्तीतील रस्ते चकाकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:26 IST2021-03-14T04:26:19+5:302021-03-14T04:26:19+5:30
चंद्रपूर : लालपेठ जुनीवस्ती येथील कॉंक्रिट रोड व नालीच्या बांधकामासाठी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान ...

लालपेठ जुनी वस्तीतील रस्ते चकाकणार
चंद्रपूर : लालपेठ जुनीवस्ती येथील कॉंक्रिट रोड व नालीच्या बांधकामासाठी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नगरसेविका मंगला आखरे, यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक अमोल शेंडे, कलाकार मल्लारप, गौरव जोरगेवार, हरमन जोसेफ, राजेंद्र आखरे, शंकर मेश्राम, रुपेश माकोडे, राजू वानखेडे, शेख नासिन, गजानन धनकर आदींची उपस्थिती होती. आ.जोरगेवार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत शहरातील विविध विकास कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. यातील अनेक कामे प्रगतिप्रथावर आहे. दरम्यान लालपेठ जुनी वस्ती प्रभाग क्रमांक १४ येथील रोडच्या कॉंक्रिटीकरणासाठी व नालीच्या बांधकामासाठी स्थानिक विकास निधी अंतर्गत १९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोरोना संकटामुळे विकास कामे थंडावली आहे. असे असले तरी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात विकासाची गती थांबणार नाही, या दिशेने माझे नियोजन सुरु असल्याचे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले.